Finance Commission : डॉ. निरंजन राजाध्यक्ष वित्त आयोगाचे सदस्य

सरकारने सोळाव्या वित्त आयोगासाठी चार पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांचा समावेश आहे.
finance
finance sakal
Updated on

नवी दिल्ली : सरकारने सोळाव्या वित्त आयोगासाठी चार पूर्णवेळ सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात अर्थ ग्लोबलचे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांचा समावेश आहे.

त्यांच्यासह १५ व्या वित्त आयोगाचे माजी सदस्य अजय नारायण झा, माजी विशेष सचिव ॲनी जॉर्ज मॅथ्यू, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. निरंजन राजाध्यक्ष मेघनाद देसाई अकादमी ऑफ इकॉनॉमिक्सच्या शैक्षणिक सल्लागार मंडळाचे आणि सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य आहेत. यापूर्वी, सरकारने निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

finance
Finance Commission Fund: विकास व पायाभूत सुविधांसाठीच वित्त आयोगाचा निधी; ग्रामविकास विभागाने केले स्पष्ट

अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात सहसचिव असलेले ऋत्विक पांडे यांची आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.