Earn Money From Home : ना वेळेचं बंधन ना काही..आरामात घरी बसून कमवा बक्कळ पैसे

आज आम्ही तुम्हाला असेच काही वर्क ऑप्शन्स सांगणार आहोत
Earn Money From Home
Earn Money From Home esakal
Updated on

Earn Money From Home : घर चालवण्यासाठी प्रत्येकास गरज असते ती पैशांची. काही जण पैसे नोकरी करून कमावतात तर काही जण व्यवसाय करून. मात्र काही लोकांना दिवसभर ऑफिसमध्ये ८ तास बसून काम करणे अजिबात आवडत नाही. असे लोक अशा कामाच्या शोधात असतात जिथे त्यांच्या सोयीनुसार त्यांना काम करता येईल. तेव्हा आज आम्ही तुम्हाला असेच काही वर्क ऑप्शन्स सांगणार आहोत.

प्रोग्रामर

या क्षेत्रात कमी वेळात तुम्हाला बक्कळ पैसे कमावता येतात. अनेक कंप्युटर लँग्वेज आणि सिक्रप्ट शिकून घेतल्यास तुम्हाला घरबसल्या पैसे कमावता येऊ शकतात. हे काम पारंपारिक असले तरी यात कमी वेळात तुम्ही पुरेसे पैसे कमावू शकता. सुरुवातीला तुम्ही ५०-६० हजार रुपये सहज कमावू शकता.

अॅनिमेटर

तुम्ही ग्राफिक्समध्ये उत्तम असाल आणि तुम्हाला क्रिएटिव्ह फिल्डमध्ये काम करायला आवडत असेल तर तुम्ही कंपन्यांसाठी घरी बसून लोगो डिझाइन करू शकता. ग्राफिक्स बनवू शकता. सोशल मीडिया बॅनर डिझाइन करू शकता. कार्टून कॅरेक्टरसुद्धा बनवू शकता. यातून तुम्ही महिन्याला ३०-६० हजार रुपये कमवू शकता.

प्रोडक्ट रिव्ह्यूवर

या कामात तुम्हाला बसल्या बसल्या पैसे मिळू शकतात. यात तुम्हाला वेळसुद्धा तुमच्या मनानुसार निवडता येऊ शकतो. तुम्हाला यात फक्त प्रोडक्टचा रिव्ह्यू लिहून कंपनीला द्यायचा असतो. कंपनी या कामात तुम्हाला स्वत: प्रोडक्ट देते. जेणेकरून तुम्हाला प्रामाणिक रिव्ह्यू देता येईल. यात तुम्ही २०-७० हजारांपर्यंत महिन्याला कमाई करू शकता.

Earn Money From Home
TCS Job Scam: TCS नोकर भरती घोटाळा प्रकरणी कंपनीची मोठी कारवाई, 16 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

अॅप्लिकेशन डेव्हलपर

जर तुम्ही कोडिंग बॅकग्राउंडचे असाल तर तुम्ही घरबसल्या काम करू शकता. यात तुम्हाला काही अॅप्लिकेशन डेव्हलप करायच्या असतात. डिव्हाइस टेस्ट करण्याबरोबरच त्याला वेळोवेळी अपग्रेटसुद्धा करावे लागते. प्रत्येक कंपनीला अशा माणसांची गरज असते. तेव्हा यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

Earn Money From Home
Job News : लष्करात अधिकारी होण्याची संधी

अॅफिलिएट मार्केटर

तुमच्यात कनविसिंग पॉवर असेल तर तुम्ही हे क्षेत्र निवडू शकता. मोबाईल, लॅपटॉप, रागरमेंट किंवा आणखी कुठले प्रोडक्ट असो, यासाठी तुम्हाला मार्केटची गरज पडेलच. तुम्ही कस्टरमरला एखादी खास प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी कनविंस करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.