Economic Survey 2024: देशासमोर सर्वात मोठे संकट कोणते? मोदी सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणात झाला खुलासा

Key Highlights of Economic Survey 2023-24: आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 8.2% च्या वेगाने वाढेल. आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Economic Survey
Economic Survey 2024Sakal
Updated on

Economic Survey 2024 Updates: आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशाची अर्थव्यवस्था 8.2% च्या वेगाने वाढेल. आज सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आर्थिक सर्वेक्षणाने असा अंदाज वर्तवला आहे की FY25 मध्ये देशाचा GDP 6.5-7% च्या दरम्यान असेल. आर्थिक पाहणीत बँकांच्या घटत्या NPA आणि LPG, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा उल्लेख आहे.

या सर्वेक्षणात सरकारने महागाई नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांचे कौतुक केले आहे. 23 जुलै रोजी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले.

दरवर्षी किती नोकऱ्यांची गरज?

आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची कार्यशक्ती वाढवण्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी 2030 पर्यंत बिगर कृषी क्षेत्रात दरवर्षी सरासरी 78.5 लाख नोकऱ्यांची आवश्यकता असेल. जेणेकरून देशाला विकसित राष्ट्राकडे नेले जाईल.

Economic Survey
Budget 2024: गुंतवणुकीची मोठी संधी! बजेटदरम्यान 'या' मोदी स्टॉकवर ठेवा लक्ष; ब्रोकरेजने दिला मोलाचा सल्ला

शेतीवर भर देण्याची गरज

आर्थिक सर्वेक्षणाने कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे असे सांगितले. मात्र, सार्वजनिक खासगी भागीदारीवर सरकारचा भर राहणार असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार खाजगी क्षेत्राच्या नफ्यात वाढ झाली असली तरी रोजगार निर्मितीच्या बाबतीत ते खूपच मागे पडले आहे.

सर्वात मोठे आर्थिक आव्हान कोणते?

देशाच्या जीडीपी वाढीचा अंदाज सरकारकडून आर्थिक सर्वेक्षणात समोर आला असतानाच सरकारने या आर्थिक सर्वेक्षणातही मोठे आव्हान नमूद केले आहे. सरकारचे म्हणणे आहे की जागतिक आव्हानांमुळे देशाला निर्यातीच्या आघाडीवर झटका बसू शकतो, परंतु सरकार याबाबतही पूर्णपणे सतर्क आहे. जागतिक व्यवसायात आव्हाने येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. खरं तर, जागतिक अनिश्चिततेचा भांडवलाच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो.

Economic Survey
ITR Filing on WhatsApp: आता व्हॉट्सॲपवरूनही आयटीआर भरता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आर्थिक सर्वेक्षणातील महत्त्वाच्या गोष्टी

  • शिक्षण आणि रोजगार यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे

  • राज्यांची क्षमता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे

  • 2030 पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब बनविण्यावर भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.