RBI Repo Rate: आरबीआयने दरवाढ थांबवल्याचे अर्थतज्ञांकडून स्वागत

वर्षभर व्याजदरवाढ केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आज रेपोदर जैसे थे ठेवल्याचे अर्थतज्ञांनी स्वागत केले आहे.
RBI
RBI esakal
Updated on

RBI Repo Rate - वर्षभर व्याजदरवाढ केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने आज रेपोदर जैसे थे ठेवल्याचे अर्थतज्ञांनी स्वागत केले आहे. यामुळे गृहकर्जाचे व्याजदर यापुढे वाढणार नसल्याने बांधकाम क्षेत्रानेही आनंद व्यक्त केला आहे.

आता ही स्थिती अशीच कायम राहून चलनवाढ आटोक्यात राहिली तर व्याजदर हळुहळू कमीदेखील होतील, असेही तज्ञांचे सांगणे आहे. (Latest Marathi News)

१. रेपोरेट न वाढवण्याचा आजच्या रिझर्व बँकेचा निर्णयाचे आणि स्वागत करतो. या निर्णयामुळे गृहकर्जाचे व्याजदर स्थिर राहून गृहखरेदीदारांना मोठाच दिलासा मिळेल. सध्या चांगल्या विकसकांकडे खरेदीदारांची घरांना मागणी आहे.

या निर्णयात भारतीय अर्थव्यवस्थेतील सूप्त सामर्थ्य प्रतिबिबिंत झाले आहे. यापुढे रिझर्व बँक व्याजदर हळूहळू कमी करेल अशी आमची अपेक्षा आहे. त्याने घर खरेदीदारांना प्रोत्साहन मिळेल. - मंजू याज्ञिक, नरेडको महाराष्ट्र उपाध्यक्ष व नहार ग्रुप उपाध्यक्ष.

२. रिझर्व बँकेचे आजचे जैसे थे धोरण म्हणजे सचिन तेंडुलकरने एखाद्या खराब खेळपट्टीवर मारलेला मोठा फटका आहे. दरवाढ अगदीच अनपेक्षित नव्हती, आता यापुढील निर्णय घेण्याआधी रिझर्व बँक यापुढील चलनवाढीचा तसेच अन्य घडामोडींचाही विचार करेल.

कोणत्याही मार्गाने विकास साधण्यावर आणि चलनवाढ कमी करण्यावर रिझर्व बँकेचा भर राहील. - निलेश शहा, एमडी कोटक महिंद्र असेट मॅनेजमेंट कंपनी.

RBI
RBI : रिझर्व्ह बँकेचे आगामी पतधोरण; व्याजदरवाढीला विरामाची शक्यता

३. आरबीआयचा जैसेथे निर्णय आमच्या अपेक्षेनुसारच होता, अर्थात ही स्थिती यापुढे कायम राहील का हे आत्ताच सांगणे कठीण आहे, कारण अजूनही चलनवाढीचा थोडासा धोका आहे.

अर्थात यानंतर चलनवाढ खूपच वेगाने झाली नाही तर व्याजदर आणखीन वाढणार नाहीत असेही आम्हाला वाटते. आता रिझर्व बँकेने दरवाढ करूही नये. - संदीप यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष, डीएसपी म्युच्युअल फंड.

४. यापूर्वीच्या व्याजदर वाढीचा परिणाम सर्वत्र जाणवत असताना आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता लक्षात घेऊन रिझर्व बँकेने ठेवलेले जैसेथे धोरण अत्यंत योग्य आहे.

या धोरणाद्वारे आर्थिक स्थैर्य राखतानाच रिझर्व बँकेने विकासाच्या चिंताही दूर करण्याचे ठरवले आहे. ए. बालसुब्रमणियन, एमडी व सीईओ, आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसी.

५. रिझर्व बँकेचे जैसेथे धोरण अपेक्षेनुसारच होते. आता है जैसेथे धोरण दीर्घकाळ सुरू राहील असे दिसते. त्याचबरोबर अन्नविषयक चलनवाढ आणि उर्जेच्या किमतीमुळे होणारी चलनवाढ यावरही रिझर्व बँकेचे लक्ष राहील. - प्रशांत पिंपळे, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, बडोदा बीएनपी परिबास म्युच्युअल फंड.

६. रिझर्व बँकेचा आजचा निर्णय अपेक्षेनुसारच होता. सध्याचे व्याजदर आणि अपेक्षित चलनवाढ यांचा अंदाज घेऊन रिझर्व बँकेने अतीकठोर धोरणे राबवली नाहीत, अन्यथा त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असता.

सध्याच्या जागतिक अस्थिर परिस्थितीत आता व्याजदरवाढीला कायमचा लगाम लागेल अशी अपेक्षा आहे. अर्थात चलनवाढ खूपच झाली तर वेगळा निर्णय होऊ शकतो. - अखिल मित्तल, सीनियर फंड मॅनेजर, टाटा ॲसेट मॅनेजमेंट.

७. गेल्या वर्षभरात रिझर्व बँकेने एकूण सव्वातीन टक्के व्याज दरवाढ केली आहे. त्यामुळे या कठोर नियंत्रणांचा नेमका काय परिणाम होतो याचा आढावा रिझर्व बँकेला घ्यायचा आहे. त्यामुळे अगदी कठोर नियंत्रण लावल्यामुळे होणारा धोकाही टाळता येईल.

आजच्या जैसेथे स्थितीमुळे भविष्यातही व्याज दरवाढ होण्याची शक्यता दूर गेली आहे. कदाचित अशी स्थिती काही काळ कायम राहू शकते. - पियुष बरनवाल, सीनियर फंड मॅनेजर, व्हाइट ओक कॅपिटल असेट मॅनेजमेंट लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()