Edible Oils Price Hike Festive Season: सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात पामतेलच्या किमतीत 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच फराळ तयार करण्यासाठी तेलाचा वापर करणाऱ्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि मिठाई पदार्थ्यांच्या किमती वाढल्या आहेत. साधारणपणे घरोघरी वापरल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलाच्या किमतीत याच कालावधीत 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.