Foreign Travel: परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स

परदेशात पैसे पाठवण्यावरील कर वाढणार आहे.
Foreign Travel Tax
Foreign Travel TaxSakal
Updated on

Foreign Travel Get Expensive: जर तुम्हाला परदेशात फिरण्याची आवड असेल किंवा इतर देशांमध्ये पैसे पाठवत असाल तर आता तुमचा खर्च वाढणार आहे. 1 जुलैपासून परदेशात पैसे पाठवण्यावरील कर वाढणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती. सरकारने आयकर कायद्याच्या कलम 206C मध्ये बदल करून परदेशी प्रवासावर जास्त कर लावला आहे.

1 जुलैपासून, अशा पेमेंटवर 20 टक्के दराने TCS आकारला जाईल. सध्या तो 5 टक्के आहे. लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत, भारताबाहेर 7 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास 20% TCS कापला जाईल. ही दुरुस्ती 1 जुलै 2023 पासून लागू होईल.

या कराच्या व्याप्तीमध्ये परदेशी भेटी, परकीय चलन खरेदी, परदेशात मित्र किंवा नातेवाईकांना भेटवस्तू पाठवणे आणि परदेशी स्टॉक खरेदी करणे इत्यादींचा समावेश होतो.

परदेशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित खर्चाच्या बाबतीत, जर पालकांनी पुरावा दिला की ही रक्कम शिक्षणाच्या उद्देशाने आहे, तर एकूण रक्कम 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास TCS 5 टक्के असेल.

परदेशात शिक्षण घेणे महाग होणार:

आंतरराष्ट्रीय शिक्षण कंपनी M Square Media (MSM) चे सीईओ आणि संस्थापक संजय लाल म्हणाले, “करामुळे भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्याचा खर्च वाढेल. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

परदेशात आणि शिक्षणाचा खर्च तुलनेने कमी असलेल्या देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या पसंतीतील बदल आपण पाहू शकतो.

ते म्हणाले की, या उपाययोजनांचा भारतातील विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह आणि परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी शोधणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या पसंतींवर कसा परिणाम होईल हे येणाऱ्या काळात कळेल.

Foreign Travel Tax
Adani Group: अदानी समुहाचा मोठा निर्णय! NDTV विविध भारतीय भाषांमध्ये 9 वृत्तवाहिन्या करणार सुरू

आयकर भरताना TCS चा उल्लेख करावा लागेल:

TCS हे कराचे पेमेंट आहे, ज्या व्यक्तीकडून TCS गोळा केला जातो तो आयकर भरण्याच्या वेळी विदेशी मुद्रा व्यापारी किंवा टूर ऑपरेटरला दिलेल्या TCS वर कलम 206C (1G) अंतर्गत आयकराच्या क्रेडिटचा दावा करण्यास पात्र आहे.

यासाठी, तुम्ही टूर ऑपरेटर/फॉरेक्स डीलरकडून TCS प्रमाणपत्र (फॉर्म 27D) घेणे आवश्यक आहे. ज्याचा तुम्ही कर भरण्याच्या वेळी सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हणून वापरू शकता.

सध्याच्या नियमानुसार, जर एखादी व्यक्ती परदेशात गेली तर त्याला आयकर रिटर्नमध्ये पासपोर्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने परदेशात प्रवास करताना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असेल तर त्याला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

Foreign Travel Tax
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()