आयशर मोटर्स

(शुक्रवारचा बंद भाव : रु. ३,३५९)
आयशर मोटर्स
आयशर मोटर्स Sakal
Updated on

आयशर मोटर्स ही १९८२ मध्ये स्थापित झालेली एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. ती मोटारसायकल आणि व्यावसायिक वाहने तयार करते. ‘रॉयल एनफिल्ड’ हा प्रतिष्ठित ब्रँड या कंपनीच्या मालकीचा आहे. सध्या कंपनीच्या प्रीमियम मोटारसायकलींना मोठी मागणी असून, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ ची जोरदार सुरुवात केली आहे.

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, कंपनीला ९१८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. प्रीमियम उत्पादनांच्या बळावर कपंनीने स्टँडअलोन व्यवसायात वार्षिक आधारावर सुमारे २१ टक्के वाढ नोंदवली आहे. व्हॉल्वो समूहासोबतच्या संयुक्त उपक्रमातदेखील कंपनी लक्षणीयरीत्या प्रगती करत आहे.

कंपनीने सलग चौथ्या तिमाहीत सर्वाधिक तिमाही महसूल आणि नफा नोंदवला आहे. या कंपनीचे मध्यम वजनाच्या मोटरसायकल विभागात वर्चस्व आहे. सध्या या विभागात कंपनीकडे सुमारे ९० टक्के बाजार हिस्सा आहे. हार्ले डेव्हिडसन (हिरो मोटोकॉर्पच्या भागीदारीत) व ट्रायम्फ (बजाज ऑटोच्या भागीदारीत) यांनी नुकत्याच सादर केलेल्या २५० ते ५०० सीसी मोटरसायकलींमुळे स्पर्धा वाढणे अपेक्षित आहे.

आयशर मोटर्स
Pune : सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी; प्रशासनाकडून उपाययोजनांकडे दुर्लक्ष

हार्ले डेव्हिडसन आणि ट्रायम्फ यांच्याशी स्पर्धा असूनही, ‘रॉयल एनफिल्ड’चे प्रवर्तक सिद्धार्थ लाल याच्या वक्तव्यानुसार, वेगाने वाढणाऱ्या मध्यम आकाराच्या मोटरसायकल विभागात कंपनीला मध्यम ते दीर्घ कालावधीत सुमारे ८० टक्के हिस्सा राखण्याचा आत्मविश्वास आहे.

मोटारसायकलची वाढती मागणी, नवी उत्पादने, प्रीमियम मोटारसायकलींना प्राधान्य, निर्यातवाढ, व्यावसायिक वाहन विभागातील सुधारणा; तसेच फ्लीट युटिलायझेशनमध्ये झालेली सुधारणा यामुळे आगामी कालावधीसाठी कंपनीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.

आयशर मोटर्स
Mumbai Police : मुंबईत घातपाताची धमकी; धमकी देणारा पाँडिचेरीतून अटकेत

कंपनीने युरोपियन इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्माता ‘स्टार्क फ्यूचर एसएल’सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीमध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकलसाठी संशोधन व विकास, तंत्रज्ञान सहयोग, तांत्रिक परवाना आणि उत्पादन यांचा समावेश आहे.

गेल्या दहा वर्षात कंपनीने कर्जाचे प्रमाण कमी ठेवत गुंतविलेल्या भांडवलावर प्रति वर्ष १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसाय केला आहे.

आयशर मोटर्स
Mumbai : धक्कादायक ! 14 वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती, अल्पवयीन विद्यार्थांकडून अत्याचार

गुंतवणूकदारांनी दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेत, बाजारातील चढ-उतार; तसेच कंपनीच्या कार्यक्षेत्रातील धोका लक्षात घेऊन ‘आयशर मोटर्स’च्या शेअरमध्ये दीर्घावधीच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.