Electoral Bonds: भाजप, काँग्रेस, टीएमसीला सर्वात जास्त देणगी देणाऱ्या टॉप-5 कंपन्या कोणत्या?

Electoral Bonds: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, SBI ने 21 मार्च रोजी इलेक्टोरल बाँडच्या अल्फा न्यूमेरिक कोडची माहिती शेअर केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी इलेक्टोरल बाँडच्या डेटाची संपूर्ण यादी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर केली आहे.
Electoral Bonds
Electoral BondsSakal
Updated on

Electoral Bonds: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, SBI ने 21 मार्च रोजी इलेक्टोरल बाँडच्या अल्फा न्यूमेरिक कोडची माहिती शेअर केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की त्यांनी इलेक्टोरल बाँडच्या डेटाची संपूर्ण यादी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर केली आहे.

इलेक्टोरल बाँडचे सर्वात जास्त देणगीदार कोण आहेत?

एसबीआयच्या आकडेवारीनुसार, सेबॅस्टियन मार्टिनची कंपनी फ्यूचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस ही 1,365 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरने. 966 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर रिलायन्स-लिंक्ड क्विक सप्लाय चेनने 410 कोटींसह तिसऱ्या स्थानावर आहे.

MEGHA ENGINEERING AND
INFRASTRUCTURES LI MITED (Source Business Standard)
MEGHA ENGINEERING AND INFRASTRUCTURES LI MITED (Source Business Standard) (All figures in Rs crore)

वेदांता लिमिटेडने 400 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले, तर आरपी-संजीव गोयंका समूहातील हल्दिया एनर्जी लिमिटेडने 377 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.

FUTURE GAMING AND HOTEL SERVICES PR (Source Business Standard)
FUTURE GAMING AND HOTEL SERVICES PR (Source Business Standard) (All figures in Rs crore)

एस्सेल मायनिंगने 224.5 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड आणि वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनीने 220 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने 198 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले, तर केव्हेंटर्स फूडपार्क लिमिटेड आणि एमकेजे एंटरप्रायझेसने अनुक्रमे 195 कोटी आणि 192.4 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.

QWIKSUPPLYCHAINPRIVATELIMITED (Source Business Standard)
QWIKSUPPLYCHAINPRIVATELIMITED (Source Business Standard) (All figures in Rs crore)

कोणत्या राजकीय पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून सर्वाधिक पैसे मिळाले?

भारतीय जनता पक्षाला (भाजप) गेल्या चार वर्षांतील सर्वात जास्त रक्कम इलेक्टोरल बाँड योजनेतून मिळाली, एकूण 6,000 कोटींहून अधिक रक्कम भाजपाला मिळाली. हैदराबादस्थित मेघा इंजिनिअरिंगने (MEIL) भाजपचे सर्वाधिक जास्त इलेक्टोरल बाँड खरेदी केले, त्यांनी 519 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले.

HALDIA ENERGY LIMITED (Source Business Standard)
HALDIA ENERGY LIMITED (Source Business Standard) (All figures in Rs crore)

त्यानंतर Kwik सप्लायने 375 कोटी, वेदांताने 226.7 कोटी आणि भारती एअरटेलने 183 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले. भाजपच्या इतर मोठ्या देणगीदारांमध्ये मदनलाल लिमिटेड (रु. 175.5 कोटी), केव्हेंटर्स फूडपार्क इन्फ्रा (रु. 144.5 कोटी), आणि डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स (रु. 130 कोटी) यांचा समावेश आहे.

उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी वैयक्तिकरित्या भाजपला 35 कोटी रुपयांची देणगी दिली, तर इतर अनेकांनी 10-25 कोटी रुपयांची देणगी दिली.

VEDANTA LIMITED (Source Business Standard)
VEDANTA LIMITED (Source Business Standard) Sakal

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) हा दुसरा सर्वात मोठा लाभार्थी पक्ष आहे, ज्याने फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसकडून सर्वात मोठी देणगी मिळाली, त्याची किंमत 542 कोटी रुपये होती. हल्दिया एनर्जी (रु. 281 कोटी), धारिवाल इन्फ्रा (रु. 90 कोटी), आणि MKJ एंटरप्रायझेस (रु. 45.9 कोटी) हे देखील TMC चे मोठे देणगीदार होते.

काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे, वेदांतने सर्वात जास्त 125 कोटी रुपये, त्यानंतर वेस्टर्न यूपी ट्रान्समिशन कंपनी 110 कोटी, एमकेजे एंटरप्रायझेस 91.6 कोटी, यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 64 कोटी आणि अविस ट्रेडिंग अँड फायनान्स लिमिटेड ( 53 कोटी रुपये). फ्युचर गेमिंगनेही काँग्रेसला 50 कोटी रुपयांची देणगी दिली.

MEIL ही तेलंगणा-आधारित भारत राष्ट्र समिती (BRS) साठी 195 कोटी रुपयांची देणगी देणारी सर्वात मोठी देणगीदार कंपनी होती. यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने BRS ला 94 कोटी रुपयांची देणगी दिली आहे, तर चेन्नई ग्रीन वुड्स प्रायव्हेट लिमिटेड (रु. 50 कोटी), डॉ रेड्डीज लॅब्स (32 कोटी) आणि हेटेरो ड्रग्स लिमिटेड (30 कोटी) यांचा समावेश आहे.

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) साठी, फ्युचर गेमिंगने 503 कोटी रुपयांची देणगी दिली, त्यानंतर मेघा इंजिनिअरिंगने 85 कोटी रुपयांच्या देणगी दिली. वेस्टवेल गॅसेसने 8 कोटी, आस्कस लॉजिस्टिक्सने 7 कोटी आणि फर्टिलँड फूड्सने 5 कोटी रुपयांची देणगी दिली.

कोणत्या कंपन्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी दिली?

फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसने TMC ला 542 कोटी रुपयांची सर्वात जास्त देणगी दिली, त्यानंतर DMK ला 503 कोटी रुपये, YSR काँग्रेस पार्टी (YSRCP) ला 154 कोटी आणि भाजपला 100 कोटी रुपये दिले. तसेच काँग्रेस पक्षाचे 50 कोटी रुपयांचे बाँड विकत घेतले.

मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भाजपला सर्वाधिक 584 कोटी रुपयांच्या बाँडसह देणगी दिली. त्यात BRS (रु. 195 कोटी), DMK (रु. 85 कोटी), YSRCP (रु. 37 कोटी) आणि तेलगू देसम पार्टी (रु. 28 कोटी) दिले.

क्विक सप्लाय चेनने 375 कोटी रुपयांची देणगी भाजपला दिली, तसेच महाराष्ट्रात शिवसेना (रु. 25 कोटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) 10 कोटी रुपयांची देणगी दिली.

वेदांता लिमिटेडने देखील भाजपला 230.2 कोटी रुपयांची देणगी दिली आणि काँग्रेसला 125 कोटी रुपये आणि बिजू जनता दल (बीजेडी) ला 40 कोटी रुपयांची देणगी दिली.

हल्दिया एनर्जी लिमिटेडने प्रामुख्याने टीएमसीला (रु. 281 कोटी) देणगी दिली, त्यानंतर भाजप (81 कोटी) आणि काँग्रेस (रु. 15 कोटी) रुपयांची देणगी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.