Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

Elon Musk: पूर्वी ट्विटर या नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आता अडचणीत आले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या बड्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी ते विकत घेण्यासाठी गुंतवलेले पैसे बुडत आहेत.
Elon Musk
Elon MuskSakal
Updated on

Elon Musk: पूर्वी ट्विटर या नावाने ओळखले जाणारे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आता अडचणीत आले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्ससारख्या बड्या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी ते विकत घेण्यासाठी गुंतवलेले पैसे बुडत आहेत.

X चे मूल्य आता 75 टक्क्यांहून अधिक खाली गेले आहे. यामुळे इलॉन मस्कच नव्हे तर त्यांचे गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. ही घसरण कायम राहिल्यास त्यांना लवकरच कठोर निर्णय घ्यावे लागतील.

इलॉन मस्क यांना 34 अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान

फिडेलिटी ब्लू चिप ग्रोथ फंडच्या अहवालानुसार, इलॉन मस्कने ट्विटर सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले होते. त्यादरम्यान, फिडेलिटीने त्यात सुमारे 19.6 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली होती.

अहवालानुसार, X चे बाजार मूल्य केवळ 9.4 अब्ज डॉलर्स आहे. अशाप्रकारे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांना सुमारे 34 अब्ज डॉलर्सचे मोठे नुकसान झाले आहे. इलॉन मस्कसाठी हा मोठा आर्थिक धक्का आहे.

Elon Musk
Samsung Strike: सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच; पोलिसांनी 900हून अधिक कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात, काय आहे प्रकरण?

महसूल निम्म्यावर आला आहे

फिडेलिटीने X चे मूल्य सतत कमी केले आहे. यावेळी त्याने त्याचे बाजारमूल्य 78.7 टक्क्यांनी कमी केले आहे. यापूर्वी जानेवारी आणि मार्चमध्येही त्यांनी इलॉन मस्कच्या या सोशल मीडिया कंपनीचे मूल्य कमी केले होते.

वर्ष 2023 मध्ये, X सुमारे 2.5 अब्ज डॉलर कमाई करेल असा अंदाज आहे, ही कमाई वर्ष 2022 च्या केवळ निम्मी आहे. X च्या एकूण उत्पन्नात जाहिरात विक्रीचा वाटा सुमारे 75 टक्के आहे. पण, त्यात सातत्याने घट होत आहे.

Elon Musk
Gandhi Jayanti 2024: बंदे मे था दम! शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांनी शिकावं बापूंचं मनी मॅनेजमेंट

एक्सच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह, बंदची भीती

खर्च कमी करण्यासाठी कंपनीने आपले सॅन फ्रान्सिस्को कार्यालय आधीच बंद केले आहे. याशिवाय अनेक कर्मचाऱ्यांचीही बदली केली जात आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भवितव्याबद्दल कर्मचारीही घाबरले आहेत.

फिडेलिटी व्यतिरिक्त, बिल ऍकमन आणि सॉन डिडी कॉम्ब हे देखील त्यांचे गुंतवणूकदार आहेत. सॉनवर मानवी तस्करीसारखे गंभीर आरोप आहेत. अशा परिस्थितीत एक्सच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते बंद होण्याची भीतीही लोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.