Tesla Layoff: इलॉन मस्कचा धक्कादायक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

Tesla Layoff: इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला आपल्या 10% पेक्षा जास्त कामगारांना कमी करणार आहे. कंपनीची विक्री सतत घसरत आहे. या कारणास्तव कंपनी कर्मचारी कपात करणार आहे. मस्क यांनी शेवटची कर्मचारी कपात 2022 मध्ये केली होती.
Elon Musk
Tesla LayoffSakal
Updated on

Tesla Layoff: इलॉन मस्कची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला आपल्या 10% पेक्षा जास्त कामगारांना कमी करणार आहे. कंपनीची विक्री सतत घसरत आहे. या कारणास्तव कंपनी कर्मचारी कपात करणार आहे. मस्क यांनी शेवटची कर्मचारी कपात 2022 मध्ये केली होती.

यूएस नियामकांकडे दाखल केलेल्या माहितीनुसार, टेस्लाच्या कर्मचाऱ्यांची संख्या 2021 च्या अखेरीस सुमारे 1,00,000 वरून 2023 च्या शेवटी 1,40,000 पेक्षा जास्त झाली आहे. अशा परिस्थितीत 10 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यास त्यांची संख्या 14 हजाराच्या आसपास असेल. (Elon Musk's Tesla lays off 14,000 global positions amid slowdown in EV demand)

टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

टेस्ला शेअर्स सोमवारी 5.6% घसरुन 161.48 डॉलरवर बंद झाले. टेस्ला कंपनीचे शेअर्स या वर्षी 31% घसरले आहेत, तसेच S&P 500 निर्देशांकातील सर्वात वाईट-कामगिरी करणारे शेअर्स बनले आहेत. (Tesla to lay off more than 10 percent of staff worldwide amid falling sales)

Elon Musk
आता बँकांना कर्जावरील छुपे शुल्क लपवता येणार नाहीत; RBI ने जारी केल्या सूचना

मस्कने सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की, कंपनीच्या वाढीच्या पुढील टप्प्यासाठी तयारी करत असताना, खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक पैलूकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आम्ही संस्थेचा सखोल आढावा घेतला आहे आणि जागतिक स्तरावर आमचे कर्मचारी 10% पेक्षा जास्त कमी करण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.

मागणीत सतत घसरण होत आहे

अमेरिका आणि चीनमध्ये टेस्ला वाहनांची विक्री सातत्याने कमी होत आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत वाहन वितरणात घसरण नोंदवली आहे. 4 वर्षात पहिल्यांदाच विक्रीत घसरण झाली आहे. दरम्यान, कंपनीने लोकांसाठी परवडणारी ईव्ही बनवण्याची आपली योजनाही रद्द केली आहे.

Elon Musk
भू-राजकीय समस्यांमुळे जागतिक पातलीवर मालवाहतुकीत अडथळे येत असल्याने व्यापारी मालाच्या आयात-निर्यातीत घट

टेस्ला एक परवडणारी कार आणणार होती, ज्याची किंमत 25,000 डॉलर असण्याची अपेक्षा होती. या मॉडेलबद्दल गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर विश्वास होता. मॉडेल 2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारचे उत्पादन 2025 च्या उत्तरार्धात सुरू होईल, असे मस्क यांनी सांगितले होते. मात्र आता ते ही योजना बंद करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.