ईमामी लि. (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७७९)

ईमामी ही कंपनी आपल्या सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. बोरोप्लस, झंडू बाम, केश किंग, फेअर अँड हँडसम यांसारखी उत्पादने ही कंपनीच्या यशाची साक्ष देतात.
ईमामी लि. (शुक्रवारचा बंद भाव :  रु. ७७९)
ईमामी लि. (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७७९)sakal
Updated on

स्मार्ट गुंतवणूक

भूषण गोडबोले,(‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

ईमामी ही कंपनी आपल्या सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. बोरोप्लस, झंडू बाम, केश किंग, फेअर अँड हँडसम यांसारखी उत्पादने ही कंपनीच्या यशाची साक्ष देतात. कंपनीने गहाण ठेवलेल्या शेअरची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी करून आर्थिक स्थिरतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे; तसेच गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भविष्यात गहाण ठेवलेल्या शेअरची संख्या ‘शून्य’ करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांमध्ये नवे संशोधन सुरू केले आहे. नव्या उत्पादनांमध्ये कंपनीने ‘डर्मीकूल हर’, ‘डर्मीकूल साबण’, केशकिंग ब्रँड अंतर्गत ऑर्गेनिक रोजमेरी ऑईल, रोजमेरी शॅम्पू ई-कॉमर्सद्वारे उपलब्ध केले आहेत. डिजिटल-फर्स्ट उत्पादनांमध्ये कंपनीने ‘डिया-बीटीएस टॉनिक’, ‘डिया-बीटीएस’ गोळ्या, ‘झंडू नीलीभृंगार हेअर ऑइल’, ‘झंडू अश्वगंधा ६६’ आदींचा समावेश आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून नवी उत्पादने उपलब्ध करून कंपनी डिजिटल मार्केटमध्येदेखील पकड वाढवत आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गोयंका यांच्या म्हणण्यानुसार, ‘गहाण ठेवलेल्या शेअरची संख्या कमी करणे हे कंपनीच्या आर्थिक स्थिरतेच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे कंपनीला अधिक आर्थिक स्वायत्तता मिळाली असून, गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. भविष्यातील विकासासाठी व विस्तारासाठी अधिक पारदर्शकता आणि स्थैर्य कायम ठेवण्याची कंपनीची योजना आहे.’

जाहीर झालेल्या तिमाही निकालानुसार, व्यवसायवृद्धी दर्शवत सध्या कंपनीचा निव्वळ नफा १५१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दीर्घावधीच्या आलेखानुसार या कंपनीच्या शेअरने ऑगस्ट २०१५ पासून मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार दर्शविला होता. गेल्या महिन्यात या शेअरने ८१६ रुपयांवर बंद भाव देऊन दीर्घावधीच्या आलेखानुसार तेजीचे संकेत दिले आहेत. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता लक्षात घेता, जोखीम लक्षात घेऊन या कंपनीच्या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे

आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.