Debit Card EMI: क्रेडिट कार्ड नाही, टेन्शन घेऊ नका; आता ATM कार्डवर भरता येणार EMI, असा करा अर्ज

तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे हप्ते/ईएमआय सहज पेमेंट करू शकता. मात्र, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर घाबरण्याची गरज नाही.
Debit Card EMI
Debit Card EMISakal
Updated on

Debit Card EMI: जेव्हा लोक महागडा फोन, लॅपटॉप किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करतात तेव्हा त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे हप्ते/ईएमआय सहज पेमेंट करू शकता.

मात्र, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या ATM/डेबिट कार्डवर EMI ची सुविधा घेऊ शकता? तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसल्यास, EMI च्या सोयीसाठी एटीएम कार्ड हा तुमच्यासाठी पर्याय असू शकतो.

काही बँका त्यांच्या डेबिट कार्डधारकांना ईएमआय सुविधा देत आहेत. यासाठी बँकेने विहित केलेली पात्रता पूर्ण करावी लागेल. सामान्यतः, डेबिट कार्ड ईएमआयची सुविधा बँकेद्वारे फक्त तिच्या सर्वोत्तम ग्राहकांना दिली जाते, म्हणजे ज्यांच्याकडे क्रेडिट/सिबिल स्कोअर चांगला असतो.

Debit Card EMI
RBI Notes: तुमच्या खिशातली नोट 'फर्जी' तर नाही...कागदापासून नव्हे तर 'या' वस्तुपासून बनवल्या जातात नोटा

डेबिट कार्ड EMI साठी पात्रता जाणून घ्या:

  • SBI ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567676 वर DCEMI एसएमएस करा.

  • अॅक्सिस बँकेचे ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 56161600 वर DCEMI एसएमएस करा.

  • बँक ऑफ बडोदा ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 8422009988 वर DCEMI एसएमएस करा.

  • HDFC बँकेचे ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून MYHDFC ला 5676712 वर एसएमएस करा.

  • ICICI बँकेचे ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 5676766 वर DCEMI एसएमएस करा.

  • कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक 5676788 वर DCEMI एसएमएस करा.

  • फेडरल बँकेचे ग्राहक 5676762 वर DCEMI एसएमएस करतात किंवा 7812900900 वर मिस कॉल द्या.

पुढे तुम्हाला बँकेने दिलेली EMI योजना निवडावी लागेल. ही योजना तुमच्या आर्थिक गरजा आणि तुमच्या क्षमतेनुसार बदलू शकते. तुम्ही व्याजदर, हप्त्यांची संख्या आणि परतफेडीचा कालावधी यासारख्या बाबींचा विचार केला पाहिजे.

Debit Card EMI
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.