Enforcement Directorate ED has arrested Naresh Goyal the founder of Jet Airways
नवी दिल्ली- जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात त्यांची दिवसभर चौकशी झाली होती. त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. बँकला 538 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. एएनआयने यांसदर्भातील माहिती दिली आहे.
कँनरा बँकेतील ५३८ कोटी घोटाळ्याप्रकरणी त्यांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. गोयल यांना मुंबई विशेष PMLA हायकोर्टासमोर सादर केले जाईल.मे महिन्यामध्ये सीबीआयने याप्रकरणात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ईडीने सूत्रं हातात घेतली होती. गोयल यांना पीएमएलए Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यातंर्गत ताब्यात घेण्यात आले आहे.
पीएमएलए मुंबई हायकोर्टात आणल्यानंतर ईडी त्यांना ताब्यात घेण्याची मागणी करेल. ७४ वर्षीय गोयल तुर्तास अटकेत असतील. सीबीआयने जुलै २०२१ प्रकरणी यात घोटाळा झाल्याचं स्पष्ट केलं होतं. कथित रित्या जेएलआय Jet Lite (India) Ltd (JLL) फँडामधून कंपनीसाठी १,४१०.४१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. हा खर्च गोयल कुटुंबाच्या कर्मचाऱ्यांचे पगार, फोन बील, वाहन खर्च आणि ईतर खाजगी खर्चासाठी वापरण्यात आला होता.
फॉरेन्सिक ऑडिटमधून ही गोष्ट स्पष्ट झाली होती. त्यानंतर सीबीआयने एफआयर दाखल केला होता. JIL ने कथितरित्या फंड कर्ज, गुंतवणुकीसाठी वर्ग केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.