EPACK Durable IPO: इपॅक ड्यूरेबलचा आयपीओ खुला, जाणून घ्या काय आहे प्राइस बँड?

EPACK Durable IPO: इपॅक ड्यूरेबलचा (Epack Durable) आयपीओ खुला झाला आहे. आयपीओमध्ये 218-230 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. शिवाय एकावेळी 65 शेअर्सच्या लॉटसाठी बोली लावावी लागणार आहे. हा आयपीओ 23 जानेवारीला बंद होईल.
EPACK Durable IPO
EPACK Durable IPOSakal
Updated on

EPACK Durable IPO: इपॅक ड्यूरेबलचा (Epack Durable) आयपीओ खुला झाला आहे. आयपीओमध्ये 218-230 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. शिवाय एकावेळी 65 शेअर्सच्या लॉटसाठी बोली लावावी लागणार आहे. हा आयपीओ 23 जानेवारीला बंद होईल. ग्रे मार्केटमध्ये याचे शेअर्स आयपीओच्या अप्पर प्राइस बँडपेक्षा 31 रुपये म्हणजे 13.48 टक्क्यांच्या जीएमपीवर आहेत.

या आयपीओमध्ये 400 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील. विद्यमान भागधारकांच्या वतीने 1.31 कोटी शेअर्स ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत ठेवले जातील. इपॅक ड्यूरेबल ही भारतातील रूम एअर कंडिशनर्सची दुसरी सर्वात मोठी ओरिजिनल डिझाइन मॅन्युफॅक्चरर आहे.

इपॅक ड्यूरेबलमधील प्रमोटर्सची हिस्सेदारी 65.36 टक्के आहे आणि सार्वजनिक भागीदारी 34.64 टक्के आहे. इंडिया ऍडव्हांटेज फंड S4 I आणि ऑगस्टा इन्वेस्टमेंट झिरो पीटीई लिमिटेड हे कंपनीतील सर्वात मोठे सार्वजनिक भागधारक आहेत.

दोघांकडे अनुक्रमे 18.52 टक्के आणि 13.43 टक्के हिस्सा आहे. ऍक्सिस कॅपिटल, डीएएम कॅपिटल ऍडव्हायजर्स आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे आयपीओसाठी मर्चंट बँकर आहेत.

EPACK Durable IPO
Tata Steel: टाटा स्टीलमधील 3,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; काय आहे कारण?

इपॅक ड्यूरेबल आधी रूम एसीमध्ये वापर होणारे शीट मेटल, इंजेक्शन मोल्डेड, क्रॉस फ्लो फॅन आणि पीसीबीए सारखे विविध घटक तयार करायची. नंतर त्यांनी इंडक्शन कुकटॉप्स, मिक्सर-ग्राइंडर, वॉटर डिस्पेंसर डिझाइन करून आणि उत्पादन करून लहान गृहोपयोगी (एसडीए) मार्केटमध्ये प्रवेश केला.

ब्लू स्टार, डायकिन एअरकंडिशनिंग इंडिया, व्होल्टास, हॅवेल्स इंडिया आणि हायर अप्लायन्सेस (इंडिया) हे रूम एअर कंडिशनर विभागातील इपॅक ड्यूरेबलचे ग्राहक आहेत. तर लहान गृहोपयोगी वस्तूंमध्ये बजाज इलेक्ट्रिकल्स, बीएसएच हाउसहोल्ड अप्लायंसेज मॅन्युफॅक्चरिंग, उषा इंटरनॅशनल इत्यादींना पुरवते.

EPACK Durable IPO
RBI: EMIचा हप्ता आणि महागाईवर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, व्याजदर...

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.