Free Life Insurance: 7 लाखांचा मोफत विमा हवाय, जाणून घ्या काय आहे EPFO ची योजना?

आपल्याला भविष्य निर्वाह निधीबाबतचे बहुतेक नियम माहित नसतात.
Free Life Insurance
Free Life InsuranceSakal
Updated on

Free Life Insurance: आपल्याला भविष्य निर्वाह निधीबाबतचे बहुतेक नियम माहित नसतात. पैसे काढण्यापासून ते हस्तांतरणापर्यंत, आजकाल सर्व काही ऑनलाइन आहे. परंतु, शिल्लक, ईपीएफ हस्तांतरण किंवा पीएफ काढणे याशिवाय, अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला माहित नसतात.

ईपीएफचे असेच एक सायलेंट फीचर आहे, जे बहुतेक लोकांना माहित नाही. नोकरदार लोकांना या वैशिष्ट्याची माहिती असली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही याची माहिती दिली पाहिजे. संघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना EPF खात्यासह 7 लाख रुपयांपर्यंतचे जीवन विमा संरक्षण (EDIL Insurance cove) मोफत मिळते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तिच्या सर्व सदस्यांना ही सुविधा पुरवते. EPFO सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती जीवन विम्याच्या रकमेवर दावा करू शकते.

EDLIs अंतर्गत विमा संरक्षण उपलब्ध:

EPFO सदस्यांना कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम अंतर्गत विमा संरक्षणाची ही सुविधा मिळते. या योजनेंतर्गत, सदस्याच्या मृत्यूनंतर, विमा संरक्षण अंतर्गत नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात.

यापूर्वी त्याची मर्यादा 3,60,000 रुपये होती. नंतर विमा संरक्षणाची मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली आणि सप्टेंबर 2020 मध्ये त्याची मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली. बोनसची मर्यादाही 1.5 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आली आहे.

विमा संरक्षणाची रक्कम कशी ठरवली जाते?

एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला 20% बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट रक्कम मिळते. याचा अर्थ सध्या 15,000 रुपयांच्या मूळ उत्पन्नाच्या कमाल मर्यादेनुसार, 30x ₹ 15,000 = ₹ 4,50,000 प्राप्त होतील. याशिवाय, दावेदाराला ₹ 2,50,000 ची बोनस रक्कम देखील दिली जाईल. एकूणच, ही रक्कम कमाल 7 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Free Life Insurance
Kishore Biyani: तिरुपती मंदिरात जाऊन शिकलो, बिग बाजारमधील गर्दी कशी सांभाळायची

विमा दावा कसा मिळवायचा?

पीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर, खात्याचा नॉमिनी विमा रकमेवर दावा करू शकतो. यासाठी विमा कंपनीला मृत्यू प्रमाणपत्र, उत्तराधिकार प्रमाणपत्र आणि बँक तपशील देणे आवश्यक आहे.

जर पीएफ खात्याचा कोणीही नॉमिनी नसेल तर कायदेशीर वारस या रकमेवर दावा करू शकतो. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी, नियोक्त्याला फॉर्मसह, विमा संरक्षणाचा फॉर्म देखील जमा करावा लागताे. नियोक्ता या फॉर्मची पडताळणी करतो. यानंतर विम्याचे पैसे मिळतात.

पीएफ खातेधारकाचा मृत्यू नोकरीदरम्यान म्हणजेच निवृत्तीपूर्वी झाला असेल तरच पीएफ खात्यावरील या विम्यावर दावा केला जाऊ शकतो.

Free Life Insurance
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.