EPF Rules : पीएफ खात्यावर टॅक्स फ्री व्याज मिळते का, निवृत्तीनंतर किती काळ पैसे ठेवता येतात? जाणून घ्या नियम

कर्मचारी आपल्या पीएफ खात्यात पैसे तर भरत असतात पण त्याविषयीचे नियम माहित आहेत का?
EPF Rules
EPF Rulesesakal
Updated on

Rules Of EPF In Marathi :

सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजेच इपीएफ खात्यात मासिक योगदान जमा करावे लागत असते. रिटायरमेंटच्या वेळी आपले इपीएफ खाते मॅच्युअर्ड होते.

पण योजनेतील बरीच माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना नसते. तर याविषयी माहिती जाणून घेऊया.

भविष्य निर्वाह निधी रक्कम व व्याज

कर्मचारी सरकारी नोकरीत असो किंवा खासगी त्याला आवल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा ठराविक रक्कम भरावी लागतेच. सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत आपल्या पगारातून दहा टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते. तर त्यांच्या खात्यात सरकार १४ टक्के रक्कम जमा करत असते.

या खात्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त असते. तर सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त असते. त्यासाठी काही अटी असतात जाणून घेऊया.

EPF Rules
घरबसल्या तुमचा PF बॅलंस कसा तपासणार?जाणून घ्या

सेवानिवृत्तीनंतर पीएफ खात्यात किती काळ पैसे ठेवू शकतात?

जोवर कर्मचारी खात्यात पैसे भरत असतो तोवर खाते सक्रिय असते. जर त्याने नोकरी सोडली तर किंवा निवृत्त झाल्यावर किती काळ पैसा खात्यात ठेवता येतो जाणून घ्या. इपीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते. दोन महिन्यांच्या आत दुसऱ्या नोकरीत रुजू न झाल्यास खाते बंद करू शकतो. कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी इपीएफ बंद केला जाऊ शकतो.

EPF Rules
PF Interest: पीएफ व्याजासाठी वयोमर्यादा नक्की किती आणि का?

इपीएफ खात्याविषयी अपडेट्स

निष्क्रिय खाते च्या सुधारीत व्याख्येनुसार एखादे खाते ५८ वर्षांच्या वयानंतर म्हणजे ५५ वर्षांच्या निवृत्तीच्या वयाच्या ३६ महिन्यांनंतर निष्क्रिय होते. जर एखादा कर्मचारी ५६ किंवा ५७ वर्षाला सेवानिवृत्त झाला तर त्याचे वय ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत इपीएफ खाते कार्यरत राहते.

  • आपले इपीएफ खाते निष्क्रिय होण्यापूर्वी इपीएफ खात्यातील पैसे निवृत्तीच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंत तसेच राहू शकतात. पण वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होत असाल आणि इपएफ खात्यात मासिक योगदान न दिल्याने खाते निष्क्रिय होते.

  • कर्मचाऱ्याने जर सेवानिवृत्तीपूर्वी काम करणे थांबवले तर इपीएफ खात्यात ज्या महिन्यापासून मासिक योगदान देणे थांबले तिथपासून ३ वर्षे कार्यरत राहते. पण त्यानंतर ते निष्क्रिय होते.

EPF Rules
EPFO Interest: PF खात्यात पैसे कधी येणार? EPFO ने दिली मोठी अपडेट
  • इपीएफ योजनेच्या नियमानुसार जर एखादा सदस्य ५५ वर्ष वय पूर्ण केल्यानंतर सेवेतून निवृत्त झाला किंवा त्याने कायमस्वरुपी परदेशात स्थलांतर केले असेल आणि ३६ महिन्यांच्या आत पैसे काढण्यासाठी कोणताही अर्ज केला नसेल तेव्हा ते खाते निष्क्रिय होईल.

  • नोकरी बंद झाल्यापासूम ३ वर्षांत इपीएफ खात्यातले पैसे काढले नाही तर ते खाते निष्क्रिय होते. निष्क्रिय खात्यांमध्ये ७ वर्षांच्या कालावधीसाठी हक्क न मिळालेल्या खात्यांमध्ये पडलेली रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये हस्तांतरीत केली जाते.

  • कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये हस्तातरीत केल्यानंतर रक्कम अजूनही शिल्लक राहिल्यास हस्तांतरणाच्या तारखेपासून २५ वर्षे हक्क नसलेले राहिल्यास केंद्र सरकारकडे ही रक्कम जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()