PF Interest Rate Hike: 6 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO ​​ने व्याजदरात केली वाढ

PF Interest Rate Hike: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी झालेल्या CBT बैठकीत पीएफमध्ये 0.10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
EPFO central board recommends hiking rate to a 3 year high of 8.25 percent from 8.15 percent
EPFO central board recommends hiking rate to a 3 year high of 8.25 percent from 8.15 percent Sakal
Updated on

EPFO Fixes Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटींहून अधिक पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शनिवारी झालेल्या CBT बैठकीत पीएफमध्ये 0.10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

EPFO ​​ने 2023-24 साठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF चा व्याजदर 8.25 टक्के निश्चित केला आहे. यापूर्वी सरकारने 2022-23 मध्ये पीएफ खातेधारकांच्या ठेवींवरील व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला होता. (EPFO central board recommends hiking rate to a 3 year high of 8.25 percent from 8.15 percent)

कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) शनिवारी EPFO ​​च्या 235 व्या बोर्ड बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली.

EPFO central board recommends hiking rate to a 3 year high of 8.25 percent from 8.15 percent
Multibagger Stock: अदानी टोटल एनर्जीसोबत कंपनीचा ईव्ही चार्जरसाठी करार, 'हा' शेअर करेल मालामाल

आता अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा

एका सूत्राने पीटीई या वृत्तसंस्थेला सांगितले की, "EPFO ची संस्था, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) ने शनिवारी झालेल्या बैठकीत 2023-24 साठी EPF वर 8.25 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे." (EPFO central board recommends hiking rate to a 3-year high)

CBT च्या निर्णयानंतर, 2023-24 साठी EPF ठेवींवरील व्याजदर संमतीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जाईल. यावर सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर, 2023-24 साठी EPF वरील व्याजदर EPFO ​​च्या 6 कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात जमा केले जातील.

सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदराची अंमलबजावणी होते. यापूर्वी मार्च 2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2018-19 साठी 8.65 टक्क्यांवरून 2019-20 साठी 8.5 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणले होते.

EPFO central board recommends hiking rate to a 3 year high of 8.25 percent from 8.15 percent
Sovereign Gold Bond: स्वस्त सोने घ्यायचे असेल तर पैसे ठेवा तयार; मोदी सरकारची सुवर्ण योजना 'या' तारखेला होणार सुरू

पीएफचे फायदे काय आहेत?

पीएफ म्हणजेच 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी' ही सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा मिळते. पीएफमध्ये जमा केलेल्या पैशावर व्याज मिळते आणि निवृत्तीनंतर, कर्मचारी ते एकरकमी किंवा पेन्शन म्हणून मिळवू शकतो.

पीएफमध्ये जमा केलेले पैसे तुम्ही घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधकामासाठी कर्ज घेण्यासाठी वापरू शकता. याशिवाय पीएफचा निधी मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येतो. पीएफमध्ये जमा केलेले पैसे लग्नासारख्या काही विशिष्ट परिस्थितींसाठी देखील वापरले जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.