EPFO: आनंदाची बातमी! EPFOने घेतला मोठा निर्णय; 6 कोटी PF खातेधारकांना होणार फायदा

EPFO Auto Claim Settlement: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. EPFO योजना 1952 मध्ये सुरू झाली होती. ही योजना सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती पण नंतर ती खासगी कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आली.
EPFO introduces auto claim settlement for education, marriage, housing
EPFO introduces auto claim settlement for education, marriage, housing Sakal
Updated on

EPFO Auto Claim Settlement: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. आता EPFO ​​ने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे. EPFO योजना 1952 मध्ये सुरू झाली होती. ही योजना सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती पण नंतर ती खासगी कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आली.

या योजनेत कर्मचारी आणि कंपनीकडून दर महिन्याला पीएफ फंडात ठराविक रक्कम जमा केली जाते. या निधीत शासनाकडून व्याज दिले जाते. ही योजना निवृत्ती योजना आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी आणि मासिक पेन्शनचा लाभ मिळतो.

EPFO introduces auto claim settlement for education, marriage, housing
China-India Trade: हिंदी-चीनी भाई भाई! बहिष्कारानंतरही चीनमधून आयात वाढली, 100 अब्ज डॉलर्सची उलाढाल

आता EPFO ​​ने कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता घरबांधणी, लग्न किंवा शिक्षणाचे दावे लवकर निकाली निघतील. EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे.

ईपीएफओने यासाठी ऑटो क्लेम सोल्युशन सुरू केले आहे. यामध्ये ऑनलाईन दावा निकाली काढण्यात येणार आहे. ईपीएफओने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 4.5 कोटी दावे निकाली काढले आहेत.

EPFO introduces auto claim settlement for education, marriage, housing
Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी कपात; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

पूर्वी दावे निकाली काढण्यासाठी वेळ लागत असे, आता तसे होणार नाही. ऑटो सेटलमेंटमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप असणार नाही, ज्यामुळे दावा लवकर निकाली काढला जाईल.

मंत्रालयाने म्हटले आहे की जर कोणत्याही दाव्याचे निराकरण ऑनलाईन झाले नाही तर ते नाकारले जाणार नाही किंवा परत केले जाणार नाही. ऑनलाईन दावा निकाली काढला नसल्यास, तो दुसऱ्या स्तरावरील मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल.

ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून EPFO ​​सदस्यांना लवकरात लवकर निधी मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.