Gold Vs Equity Vs Bitcoin: अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्षाची लवकरच निवड होणार आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीचा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून येत आहे. मग ते शेअर बाजार असो, सोने किंवा क्रिप्टोकरन्सी. नवीन अमेरिकन सरकार व्याजदर आणि जगभरातील देशांशी असलेले संबंध याबाबत काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.