Paytm: पेटीएम सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सुरु केले 22 स्टार्टअप्स; कंपन्यांचे बाजार मूल्य 10 हजार कोटींपेक्षा जास्त

Ex-Paytm Employees Startup: भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी पेटीएम गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पण डिजिटल व्यवहार क्षेत्रात पेटीएमचे योगदान कोणीही विसरू शकत नाही.
Ex-Paytm Employees Startup
Ex-Paytm Employees StartupSakal
Updated on

Ex-Paytm Employees Startup: चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत पेटीएमच्या निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली होती. पण भारतीय रिझर्व्ह बँकने पेटीएम पेमेंट बँकेवर कडक कारवाई केली. आरबीआयच्या आदेशानुसार पेटीएम पेमेंट बँकेवर ठेवी घेण्यावर बंदी घालण्यात आली.

आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांची बँकिंग सेवा 1 मार्चपासून बंद करण्याचे आदेश दिले होते. पेटीएम पेमेंट बँकेने नियमांकडे दुर्लक्ष केल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचलले होते. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर पेटीएमचे शेअर्स पुन्हा कोसळले. (Ex-Paytm employees run 22 startups worth over Rs 10,000 crore)

भारतातील आघाडीची फिनटेक कंपनी पेटीएम गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पण डिजिटल व्यवहार क्षेत्रात पेटीएमचे योगदान कोणीही विसरू शकत नाही.

पेटीएमच्या यश पाहून अनेक कंपन्यांनी डिजिटल पेमेंट क्षेत्रात प्रवेश केला आणि यश मिळवले. पण वाढती स्पर्धा, आर्थिक मंदी आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. पण नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वत:चे स्टार्टअप सुरु केले. आज या सर्व स्टार्टअप्सचे एकूण बाजार मूल्य अंदाजे 10,668 कोटी रुपये आहे.

Ex-Paytm Employees Startup
IPL 2024: टाटा IPLमध्ये पैशांचा पाऊस! JioCinemaची होणार चांदी; कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार का?

अहवालानुसार, सध्या देशातील 24 टक्के स्टार्टअप्स फिनटेकचे आहेत. यानंतर ई-कॉमर्स, मीडिया आणि मनोरंजन आणि सॉफ्टवेअर स्टार्टअप्स येतात. या कंपन्यांनी देशात सुमारे 2,500 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. अहवालानुसार पेटीएमने स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे.

प्रायव्हेट सर्कलच्या अहवालानुसार, यापैकी बहुतेक कंपन्या पेटीएमने जानेवारी 2018 मध्ये 300 कोटी रुपयांचा ESOP बायबॅक केल्यावर स्थापन झाल्या होत्या.

अहवालानुसार, या स्टार्टअप्समध्ये पेटीएमचे माजी उत्पादन व्यवस्थापक रोहन नायक यांचे पॉकेट एफएम, पेटीएम वॉलेटचे माजी व्यवसाय प्रमुख अमित लखोटियाचे पार्क प्लस आणि पेटीएम पोस्टपेडचे माजी व्यवसाय प्रमुख दीपक ॲबॉट यांचा समावेश आहे. तसेच नितीन मिश्रा यांच्या गोल्ड लोन कंपनी इंडियागोल्डचा समावेश आहे.

Ex-Paytm Employees Startup
Deepinder Goyal: झोमॅटोचे सीईओ दीपींदर गोयल यांनी मॉडेलशी केले लग्न; कोण आहे शार्क टँक इंडियाच्या जजची पत्नी?

याशिवाय डिजिटल पॉकेट मनी प्लॅटफॉर्म जुनियो, ऑडिओ डेटिंग प्लॅटफॉर्म FRN, चष्मा ब्रँड क्लियरदेखो, ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन क्लब जेनवाइज क्लब, फुटवेअर कंपनी योहो आणि व्हेंडिंग मशीन कंपनी दालचीनी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.