Infosys Stock Analysis : इन्फोसिसचे शेअर्स 2000 रुपयांच्या पार जाण्याचा तज्ज्ञांना विश्वास...

Infosys Stock Investment news in marathi | आयटी कंपनी इन्फोसिसच्या ( Infosys) शेअर्समध्ये 19 जुलैला अर्थात शुक्रवारी इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
Infosys Stock Analysis
Infosys Stock AnalysisSakal
Updated on

आयटी कंपनी इन्फोसिसच्या ( Infosys) शेअर्समध्ये 19 जुलैला अर्थात शुक्रवारी इंट्राडेमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. आर्थिक वर्ष 2025 च्या एप्रिल-जून तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम पाहून, ब्रोकरेज फर्म जेफरीज आणि नोमुरा यांनी इन्फोसिसच्या शेअर्सची टारगेट प्राइस वाढवली आहे.

जेफरीजने 2,040 रुपये प्रति शेअर टारगेट निश्चित केले आहे आणि 'बाय' रेटिंग दिले आहे. नोमुराने 'बाय' रेटिंगसह प्रति शेअर 1,950 रुपये नवीन टारगेट निश्चित केले आहे. चांगले तिमाही निकाल आणि ब्रोकरेजच्या या नव्या टारगेटमुळे इन्फोसिसच्या शेअर्समध्ये खरेदी वाढली आहे.

बीएसईवर शुक्रवारी सकाळी 1842.05 रुपयांवर शेअर तेजीसह उघडला. यानंतर तो मागील बंद किंमतीपेक्षा सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आणि 1843 रुपयांच्या उच्चांकावर गेला. स्टॉकसाठी हा 52 आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. कंपनीचे मार्केट कॅप 7.44 लाख कोटी आहे.

एप्रिल-जून 2024 तिमाहीत इन्फोसिसचा कंसोलिडेटेड निव्वळ नफा 7.1 टक्क्यांनी वाढून 6,368 कोटवर पोहोचला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,945 कोटी होता. चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी,

कंपनीने स्थिर चलनात उत्पन्न वाढीचा अंदाज 1-3 टक्क्यांवरून 3-4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जून 2024 तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन 21.1 टक्के होते. चालू आर्थिक वर्षात इन्फोसिसचे ऑपरेटिंग मार्जिन 20-22 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. वर्षभरातील वाढीनुसार, कंपनी 15,000-20,000 नवीन लोकांना नियुक्त करेल.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.