Fake SBI Branch: बनावट बँक शाखेचा भांडाफोड; SBIच्या नावे गावकऱ्यांची फसवणूक, लाखो रुपयांना गंडा

Fake SBI Branch: अलीकडच्या काळात बॅंक व्यवहारात विविध प्रकारे फसवणूक करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे तसेच ऑनलाईन फसवुणकीचे व इतर आर्थिक गैरव्यवहारही निदर्शनास आले आहेत.
Fake SBI Branch
Fake SBI BranchSakal
Updated on

Fake SBI Branch: अलीकडच्या काळात बँक व्यवहारात विविध प्रकारे फसवणूक करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. बनावट कागदपत्रांद्वारे तसेच ऑनलाईन फसवुणकीचे व इतर आर्थिक गैरव्यवहारही निदर्शनास आले आहेत.

मात्र, छत्तीसगडमध्ये देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) बनावट शाखा उघडून लाखोंची फसवणूक केल्याचा धाडसी प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत नोकरीच्या आमिषानेही अनेकांकडून लाखो रुपये उकळत बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली.

एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावे, अशी ही घटना. आरोपींनी अत्यंत चातुर्याने बँकेची बनावट शाखा सुरू करून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. बेरोजगार युवक व स्थानिकांना फसविण्यासाठी बनावट शाखेत, नियुक्त्या, प्रशिक्षण आदी सर्वच बनावट गोष्टींचाही घाट घालण्यात आला.

Fake SBI Branch
HDFC Bank: HDFC बँकेचे शेअर्स वाढणार का? जगातील मोठ्या गुंतवणूकदारांनी खरेदी केले 755 कोटी रुपयांचे शेअर्स
नोकरीसाठी घेतले दोन ते सहा लाख रुपये

छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून साधारण २५० कि.मी. अंतरावर असलेल्या छापोरा या सक्ती जिल्ह्यातील खेड्यात ही शाखा सुरू करण्यात आली. बँकेत सहा जणांची नियुक्तीही करण्यात आली. मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, कॅशियर आदी पदेही खऱ्याखुऱ्या बँकेप्रमाणेच होती. बँकेतील नोकरीसाठी प्रत्येकी दोन ते सहा लाख रुपये घेण्यात आले.

अनेकांनी घरातील दागिने गहाण ठेवून पैसे दिले. एसबीआय सारख्या राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी मिळाल्याने कर्मचारीही आनंदात होते. दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या बँकेत एखाद्या व्यावसायिक बँकेला साजेसे असे फर्निचर, कागदपत्रे, काउंटर असे सगळे काही होते. अनेकांनी बँकेत खाते उघडून आर्थिक व्यवहारही सुरू केले.

Fake SBI Branch
Stock Market: चीनमुळे भारतीय शेअर बाजारात कोसळतोय का? FII ने विकले 15,243 कोटी रुपयांचे शेअर्स

२७ सप्टेंबरपर्यंत बनावट बँकेचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, या गावाशेजारी असलेल्या डबरा गावातील एसबीआय बँकेच्या मॅनेजरकडे एका गावकऱ्याने या शाखेबद्दल शंका उपस्थित केली. त्यानंतर, बनावट बँकेचा भंडाफोड झाला. नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यावर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांचाही चांगलाच हिरेमोड झाला.

गावकऱ्याला आली शंका अन् झाला भांडाफोड

अजयकुमार आग्रवाल या गावकऱ्याने छापोरात ‘एसबीआय किओस्क’साठी अर्ज केला होता. मात्र, एका रात्रीत आपल्या गावात एसबीआयची शाखा सुरू झाल्याने त्याला संशय आला. यासंदर्भात विचारणा केल्यानंतर बँकेतील कर्मचारी समानधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तसेच बँकेचा शाखा क्रमांकही उपलब्ध नव्हता. या संशयातून ‘एसबीआय’च्या डबरा शाखा मॅनेजरला कळविले आणि बनावट बँकेचे पितळ उघडे पडले.

डबरा येथील एसबीआय शाखेच्या मॅनेजरने छापोरात बनावट बँक सुरू झाल्याची शंका उपस्थित केली. त्यानंतर, सखोल तपासणी केली असता ही बँक बनावट असून नियुक्तीपत्रेही बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी चार आरोपींची ओळख पटली आहे. रेखा साहू, मंदिर दास आणि पंकज यांचा यात समावेश असून पंकज बनावट बॅंकेचा मॅनेजर आहे.

- राजेश पटेल, वरिष्ठ पोलिस अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.