FACT CHECK: रिझर्व्ह बँक प्रभू रामाच्या चित्रासह 500 रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणणार? काय आहे सत्य

FACT CHECK: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह 500 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा सोहळा होत असताना, भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह 500 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे.
False claims circulate about new Rs. 500 note featuring Lord Ram, Ram Mandir
False claims circulate about new Rs. 500 note featuring Lord Ram, Ram Mandir Sakal
Updated on

FACT CHECK: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या चित्रासह 500 रुपयांची नवीन नोट जारी करणार आहे. अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा सोहळा होत असताना, भगवान श्री राम आणि अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या फोटोसह 500 रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. (New Rs 500 notes with picture of Lord Rama in the market?)

फोटो मध्ये महात्मा गांधींऐवजी भगवान श्रीरामाचा फोटो आहे. असा दावा केला जात आहे की, राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी सरकारने नवीन नोटांवरून महात्मा गांधींचे चित्र काढून त्याजागी भगवान श्रीरामाचे चित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे ही नोट व्हायरल होत आहे, मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटे बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट आहे.

False claims circulate about new Rs. 500 note featuring Lord Ram, Ram Mandir
IPO News: 19 जानेवारीला खुला होणार इपॅक ड्यूरेबलचा आयपीओ; कंपनी 'इतके' कोटी रुपये उभारणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी आणखी काही चित्रांसह 500 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात येणार असल्याच्या अफवा आल्या होत्या.

जून 2022 मध्ये, आरबीआय सध्याच्या चलन आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधींचे चित्र बदलून रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्या चित्रांसह नवीन नोटा छापण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या पोस्ट खोट्या होत्या.

False claims circulate about new Rs. 500 note featuring Lord Ram, Ram Mandir
LIC MCap: एलआयसीने एसबीआयला टाकले मागे; बनली देशातील पहिली सर्वात मौल्यवान पीएसयू कंपनी

त्यानंतर या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. तेव्हा आरबीआयने असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नसल्याचे सांगितले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.