रेपो दरवाढ आणि प्राप्तिकर नियोजन

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यापासून अनेक वेळेला व्याजदरवाढ केली, ही व्याजदरवाढ ४.७५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे;
Federal Reserve Bank of America Repo Rate Hike and Income Tax Planning finance rbi
Federal Reserve Bank of America Repo Rate Hike and Income Tax Planning finance rbi SAKAL
Updated on
Summary

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यापासून अनेक वेळेला व्याजदरवाढ केली, ही व्याजदरवाढ ४.७५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे;

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यापासून अनेक वेळेला व्याजदरवाढ केली, ही व्याजदरवाढ ४.७५ टक्क्यांपर्यंत पोचली आहे; तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दर एकूण २.५० टक्क्यांनी वाढवला आहे, जो आता ६.५० टक्के झाला आहे. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीसाठी, अल्पबचत योजनांच्या व्याजदरात १.१० टक्के वाढ केली आहे.

या व्याजदरवाढीने सर्वसामान्य नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनादेखील दिलासा मिळाला आहे. हे सुधारित वाढीव व्याजदर एक जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत लागू आहेत, म्हणजेच प्राप्तिकरदात्याला आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये (शेवटच्या तिमाहीत) व्याजदरवाढीचा परिणाम दिसणार आहे, यामुळे प्राप्तिकर नियोजन बिघडू शकते.

या अल्पबचत योजनांचा जुना आणि नवा व्याजदर :

योजना - जुना व्याजदर (टक्के) - नवा व्याजदर (टक्के)

बचत ठेव - ४ ४

एक वर्षाची मुदत ठेव - ५.५ ६.६

पाच वर्षाची मुदत ठेव ६.७ ७

सिनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम ७.६ ८

मंथली इन्कम स्कीम ६.७ ७.१

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) ६.८ ७

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ७.१ ७.१

किसान विकास पत्र (केव्हीपी) ७ ७.२

सुकन्या समृद्धी योजना ७.६ ७.६

या पार्श्‍वभूमीवर, व्याजदरवाढीमुळे प्राप्तिकर नियोजन बिघडू नये यासाठी प्राप्तिकर नियोजनाची शहानिशा होणे आवश्यक आहे.

याबद्दलचे काही प्रमुख मुद्दे :

प्राप्तिकर नियोजनामुळे प्राप्तिकरदात्यांना बचत खाते, मुदत ठेव व इतर ठेवींवरील मिळणारे वार्षिक व्याज जे करपात्र उत्पन्न आहे, याची गणना करणे किंवा हिशोब ठेवणे सोपे जाते.

व्याजदर वाढल्याने करपात्र व्याजाची रक्कम जी ‘इतर उत्पन्न स्रोत’ (Income from other sources) या वर्गात नोंदली जाते, ही वाढलेली रक्कम; तसेच कर वजावट व कर सवलतीची रक्कमदेखील ३१ मार्च २०२३ च्या आधी कळू शकेल, जे प्राप्तिकरदात्यास फायद्याचे आहे.

प्राप्तिकर कायद्याप्रमाणे एकूण करपात्र उत्पन्न काढणे महत्वाचे आहे, यामध्ये उत्पनाचे पाच स्रोत एकत्र करून येणाऱ्या उत्पन्नामधून सर्व कर वजावट व कर सवलती वजा करा त्याचबरोबर टीडीएस, टीसीएस व आगाऊ कर वजा केल्यांनतर, गणना करून अजून किती प्राप्तिकर भरावयास लागू शकतो. हे अचूक प्राप्तिकर नियोजनाने कळू शकते.

व्याजदरवाढीने भरलेला आगाऊ कर, कमी असेल, तर उर्वरित आगाऊ कर प्राप्तिकरदाता १०० टक्के (शेवटचा हफ्ता) १५ मार्च २०२३ च्या आधी भरू शकतो.

आगाऊ कर (चार हप्त्यांमध्ये १५ टक्के, ४५ टक्के, ७५ टक्के आणि १०० टक्के) वेळेत भरला नाही आणि प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्या प्राप्तिकरावर ‘कलम २३४ ब’ आणि ‘२३४ सी’ प्रमाणे प्रति महिना एक टक्का व्याज (एक एप्रिलपासून) भरावा लागतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ (आकारणी वर्ष २०२३-२४) साठी एकूण करपात्र उत्पन्न व प्राप्तिकराचे स्लॅब रेट (कर दर) असे आहेत

एकूण करपात्र उत्पन्न जुनी प्रणाली टक्के एकूण करपात्र उत्पन्न नवीन प्रणाली टक्के

० - २,५०,००० - ० - २,५०,००० -

२,५०,००१ - ५,००,००० ५ २,५०,००१ - ५,००,००० ५

५,००,००१ - १०,००,००० २० ५,००,००१ - ७,५०,००० १०

१०, ००,००० पेक्षा जास्त ३० ७,५०,००१ - १० ००,००० १५

१०,००,००१- १२,५०,००० २०

१२,५०,००१- १५,००,००० २५

१५,००,००० पेक्षा जास्त ३०

यावरून हे सहज लक्षात येते, की आर्थिक नियोजन बिघडू नये यासाठी प्राप्तिकर नियोजनाची शहानिशा होणे किती महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.