Financial Tips: गुंतवणूक, बचत आणि कर्ज काढण्यापूर्वी तरुणांनी फॉलो केल्या पाहिजेत अशा 10 सर्वोत्तम फायनान्स टिप्स

भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीं पासून वाचवण्यासाठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स समजून घ्या.
Financial Planning Tips
Financial Planning Tips Esakal
Updated on

- किरांग गांधी

उत्तम आर्थिक भविष्यासाठी, आजच्या तरुण व्यवसायिकांना आपल्या करीयरच्या सुरुवाती पासूनच स्वत:च्या वैयक्तिक आर्थिक उत्पन्नाची काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पर्सनल फायनान्स (वैयक्तिक आर्थिक उत्पन्न), ह्या नावातच आपल्या लक्षात येत असेल, की कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्न, खर्च, कर्ज, गुंतवणूक आणि बचत, अशा आर्थिक स्रोतांचं नियोजन करणे गरजेच आहे.

पैशांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्या अगोदर, आपली आर्थिक उद्दिष्ट्ये निश्चित करून ती साध्य करण्याकरिता योजना तयार करण्यासाठी योग्य ज्ञान आणि कौशल्ये असणे आवश्यक आहे.

आजच्या तरुण व्यवसायिकांना त्यांच्या आर्थिक निर्णयांचे आणि आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम पर्सनल फायनान्स (वैयक्तिक आर्थिक उत्पन्न) करते. उत्तम आर्थिक पर्यायांचा वापर करून, आपली व्यवसायिक आर्थिक बाजू मजबूत बनवू शकतात, जे त्यांना भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींपासून वाचवू शकते.

या लेखात तरुण व्यवसायिकांना त्यांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी तसेच भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणीं पासून वाचवण्यासाठी 10 पर्सनल फायनान्स टिप्स समजून घेणार आहोत.

1. स्वतःला प्रशिक्षित करा.

आर्थिक दृष्टीने सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही स्वतःला पर्सनल फायनान्स (वैयक्तिक आर्थिक उत्पन्न) संबंधित प्रशिक्षण घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. आर्थिक क्षेत्रात सातत्याने बदल होत असतात.

अशा वेळी आर्थिक दृष्ट्या सकारात्मक बदल करणे आणि तुमचं आर्थिक भविष्य घडवण्यासाठी फायदेशीर ठरणारे, नवनवीन आर्थिक ट्रेंड्स, योजना आणि साधनांबद्दल अचूक माहिती तुमच्याकडे असली पाहिजे.

फायनान्स संबंधीत स्वतःला प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही विविध मार्गांचा अवलंब करू शकता, जसे की, फायनान्स निगडित बातम्या, आर्टिकल, ब्लॉग्स आणि पुस्तके वाचणे.

तसेच तज्ञांनी आयोजित केलेल्या सेमिनार किंवा वर्कशॉप मध्ये देखील सहभागी व्हा. आर्थिक विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन कोर्सचा पर्याय देखील निवडू शकता.

तसेच एखाद्या फायनान्स गाइडच्या सल्ल्याने तुम्ही स्वतःचं आर्थिक ज्ञान वाढवण्या सोबतच, त्यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या आर्थिक सेवांचा ही लाभ घेतला जाऊ शकतो.

2. तुमचं आर्थिक ध्येय निश्चित करा.

तुम्ही विवाह करून तुमचं कुटुंब वाढवण्याच्या तयारीत आहात, तुमचं स्वतःचं स्वप्नातलं घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहात, तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय शुरु करायचा असेल, किंवा वर्ल्ड टूर करण्याची देखील तुमची इच्छा असू शकते. अशा वेळी आर्थिक ध्येय निश्चित केल्याने, ते पूर्ण करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करा.

आपण पैशांची बचत नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी करत आहोत, हेच जर आपल्याला माहिती नसेल तर बऱ्याचदा आपण कष्टाने कमवलेले पैसे हे, अनावश्यक गोष्टींवर खर्च होत राहतात.

आपलं आर्थिक ध्येय ठरवतांना ते स्मार्ट असायला पाहिजे. प्रत्येक ध्येय निश्चित करताना त्यासाठी एक विशिष्ट कालावधी ही निश्चित करावा, तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन ध्येय म्हणून त्यांना प्राथमिकता ही द्यायला हवी.

3. तुमचं आर्थिक बजेट तयार करा.

आजच्या तरुण व्यवसायिकांसाठी आर्थिक बजेट तयार करणे आणि त्याचे अचूकपणे पालन करणे, हा आर्थिक नियोजनासाठी एकमेव प्रभावी पर्याय आहे.

एक जुना गैरसमज आहे की, बजट तयार करून त्याचे आकलन करणे म्हणजे आपल्या आनंदाचा आणि सुखसोयींचा त्याग करणे, जे खरं नाही. त्या उलट बजेट आपल्याला आवश्यक सुखसोयींचा लाभ घेण्याची शक्यता वाढविण्यास मदत करतो.

बजट तयार करून, तुम्ही दरमहा किती पैसे, कोणत्या गोष्टींवर खर्च करता, या खर्चाचा योग्य माहितीपूर्वक निरीक्षण ही करू शकता. जर तुम्ही विचारपूर्वक रीतीने बजेट तयार केले, तर तुम्ही तुमचा खर्च आणि बचत यांना प्राथमिकता देण्यास यशस्वी होऊ शकता.

बजेट तुम्हाला तुमच्या राहणीमानासाठी आवश्यक असलेला खर्च आणि बचतीसाठी स्पष्टता देतो, तसेच बाहेरच्या जेवणासोबत, मनोरंजनाकरिता एक विशिष्ट निधी उपलब्ध करून देतो.

बजेटशिवाय तुम्ही एका पगारानंतर दुसऱ्या पगारावर अवलंबून राहता, ज्यामुळे आपल्या आर्थिक व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होऊ शकते, आणि अनावश्यक खर्चाचा कल वाढतो. ज्यामुळे गरजेच्या वेळी आपल्याला अनावश्यक कर्ज काढावे लागते आणि आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण असमर्थ ठरतो.

4. पैशांची बचत करून इंवेस्ट ही करा.

पर्सनल फायनान्स च्या दृष्टीने उचलेलं महत्वाचं पाऊल म्हणजे बँकेत स्वतःचं बचत खाते उघडणे आणि फिक्सड डिपॉजिट (मुदत ठेवी) काढण्याचा विचार करणे. ह्याच महत्वाचं कारण म्हणजे हे दोन्ही पर्याय तुमचे पैसे सुरक्षित ठेवून व्याजाद्वारे वाढत असतात.

जर तुमचं बँकेत सेविंग्स अकॉउंट नसेल किंवा फिक्सड डिपॉजिट नसेल तर तुम्ही ही खाती उघडण्याचा मोलाचा सल्ला तुम्हांला दिला जाईल.

तुम्ही तुमच्या रकमेवर कमवलेला व्याज हा, बँकेचा व्याज दर, ठेवीचा कालावधी, बँकेचे नियम यावर निर्धारित केला जातो. चक्रवाढ व्याज तुम्हाला तुमच्या ठेवलेल्या रकमेवरच नाही तर, त्यावर कमवलेल्या व्याजावर ही व्याज मिळवून देतो. आणि एकदा तुम्ही बँकेच्या व्यवहारांसोबत सोयीस्कर झालात की, गुंतवणुकीचे अधिक पर्याय तुम्ही स्वतःच शोधाल.

एकूण जर तुम्ही तुमच्या गुंतवणूकीसाठी विविध पर्यायांचा वापर केलात, तर गुंतवणूकीतील जोखीम कमी करता येते. तसेच परत मिळणारा व्याज आणि त्याची दीर्घकालीन स्थिरता सुनिश्चित करता येते.

जर तुम्हांला गुंतवणूकीमध्ये विविधता आणणे खूप कठीण वाटत असेल, तर ही संकल्पना मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत सांगतो. जसं म्हटलं जातं की, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नये, तसेच गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांसाठी वेगळी जोखीम ही घ्यावीच लागते.

जर तुमचं आर्थिक ध्येय हे दीर्घकालीन असेल तर तुम्ही गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडले पाहिजेत, जसे की इक्वीटी म्यूच्युअल फंड, स्टॉक्स, ELSS सारख्या टॅक्स वाचवणाऱ्या योजना.

5. पावसाळी दिवसांसाठी इमर्जेन्सी फंड जमा करून ठेवणे.

इमर्जेन्सी फंड जमा करण्यास प्राधान्य देणे अतिशय महत्वाचे आहे. जर तुमची गाडी अचानक बंद पडली किंवा एखादी मेडिकल इमर्जेन्सी उद्भवली, तर अशा अन्य आर्थिक समस्या तुमचं बजट बिघडवू शकतात.

पण समजा, अशा वेळी तुम्ही इमर्जेन्सी फंड साठी बचत केलेली असेल, जी साधारणपणे तुमचा सहा ते बारा महिन्यांचा जीवनावश्यक खर्च सहजरीत्या पार पाडू शकेल, तर हाच इमर्जेन्सी फंड तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्येत मदद करू शकतो.

त्यामुळे तुमचे आर्थिक ध्येय पूर्ण करण्यात व्यत्यय सुद्धा येणार नाही. इमर्जेन्सी फंड तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्ये दरम्यान किंवा अनपेक्षित खर्चासाठी पर्सनल लोन आणि क्रेडीट कार्ड कर्जावर अवलंबून राहण्यापासून वाचवतो.

6. कौटुंबीक संरक्षणासाठी विमा काढावा.

कोविड-19 च्या लॉकडाउनमुळे आपल्या हे लक्षात आले की, आपल्याकडे एक आरोग्य विमा नसेल तर आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, आपल्याला अनेक समस्यांचा अनपेक्षितपणे सामना करावा लागू शकतो.

आपल्याकडे विमा पॉलिसी असणं आता खूप जास्त महत्वाचे झाले आहे कारण, विमा हा आपल्याला जीवन आणि आरोग्या संबंधित समस्यांपासून दीर्घकालीन संरक्षण देण्यासोबतच आपली आर्थिक बचत करण्यात सहायक आहे. आपल्या आवाक्या बाहेर अनावश्यक खर्च करणे हे बचत कमी करण्यास कारणीभूत ठरते, जे भरून काढण्यासाठी असंख्य महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो.

आर्थिक नियोजन करण्यात आरोग्य विमा आणि जीवन विमा दोन्हीही महत्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या दुर्देवी मृत्यूने किंवा मेडिकल इमर्जेन्सी मध्ये कुटुंबाचे संरक्षण करता येते.

अशा विमा पॉलिसीज फक्त महागडे मेडिकल खर्चच नाही तर आपल्याला कर्ज घेण्यापासून वाचवण्यात फायदेशीर आहेत तसेच त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. जर तुम्ही तरुण आणि निरोगी असताना विमा पॉलिसी घेतल्यास, तुम्हाला मासिक प्रीमियमची किंमत देखील कमी भरावी लागते.

7. खूप मोठे आणि अनावश्यक कर्ज घेणे टाळा.

तुम्ही गरजेपेक्षा जास्त आणि अनावश्यक कर्ज घेतल्याने तुमच्या आर्थिक भविष्यावर आणि विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि कर्जावर अवलंबून राहणे, अशा सवयींचा त्याग केला पाहिजे.

गरजेनुसार आवश्यक तितकाच खर्च आणि बजेट सांभाळून, तरुण व्यवसायिक अनावश्यक कर्जाच्या ओझ्यापासून स्वतःला वाचवू शकतात आणि आपले आर्थिक ध्येय जसे की, घर किंवा गाडी खरेदी करणे, पैसे इंवेस्ट करणे, आर्थिक समस्येसाठी बचत, हे साध्य करू शकतात.

कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचे टाळल्यास तुमचे आर्थिक भविष्य मजबूत होते ज्यामुळे तुमच्या पैशांवर तुमचे नियंत्रण राहते आणि दीर्घकालीन आर्थिक संरक्षण प्राप्त होते.

Financial Planning Tips
Lottery Ticket: बाईपण भारी देवा! 11 जणींनी 25 रुपये गोळा करुन काढली लॉटरी, लागला 10 कोटींचा जॅकपॉट

8. निवृत्ती नंतरच्या कालावधीसाठी नियोजन करा. 

जरी अजून सेवानिवृत्त होण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, तर तरुणपणीच यासाठी बचत करणं तुमच्या फायद्याचे आहे. तरुण व्यवसायिकांनी प्रायोजित सेवानिवृत्त योजनांसारख्या गुंतवणुकीसाठी प्राधान्य देऊन आपल्या भविष्यासाठी इंवेस्ट आणि बचत करायला हवी.

चक्रवाढ व्याजाचा फायदा घेऊन वेळेनुसार तुमची इंवेस्टमेंट वाढत राहील आणि तुम्हाला सेवा निवृत्ती नंतर सुरक्षित राहता येईल. तसेच आरोग्य आणि वाढती महागाई ह्याचा विचार करून तुम्ही तुमच्या योजनांचं वारंवार पूर्व मूल्यांकन केलं पाहिजे.

निवृत्ती नंतरच्या कालावधीसाठी आधीच नियोजन केल्याने तुम्हाला मन:शांती आणि सुरक्षितता मिळते, ज्यामुळे सेवानिवृत्ती नंतर तुम्ही आर्थिक तणावाशिवाय आनंदाने जगू शकता.

Financial Planning Tips
RBI Fact Check: 'ते' चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा बनावट आहेत का? रिझर्व्ह बँकेनं दिलं स्पष्टीकरण

9. तुमची क्रेडिट हिस्ट्री मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही प्रकारचे लोन, क्रेडिट कार्ड आणि नोकरी सुद्धा मिळवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे अंत्यत महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवायची असेल तर वेळेवर बिल भरणे आवश्यक आहे.

तसेच कार्डच्या रकमेचा कमीत कमी वापर करून नवीन लोन किंवा क्रेडीट खाती उघडण्यापासून परावृत्त राहिले पाहिजे.

ह्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे क्रेडिट मॉनिटरिंग, जे तुमच्या क्रेडीट स्कोरचा आढावा घेण्यासोबतच तुम्ही ते वैयक्तिकरित्या कसे वाढवू शकता याचे योग्य मार्गदर्शन ही दिले जाते. एक चांगली क्रेडिट प्रोफाइल, तुम्हाला भविष्यात अनेक लोन अनुकूल व्याजदारात मिळू शकतात, आर्थिकदृष्ट्या ही एक उत्तम संधी आहे.

Financial Planning Tips
Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

10. आर्थिक सल्लागारांकडून सल्ला घ्यावा.

पर्सनल फायनान्सच्या गुंतागुंतीच्या जगात, स्वतःला टिकवणे हे फार आव्हानात्मक आहे पण आर्थिक विशेषज्ञ तुम्हाला अतिशय मौल्यवान आणि अचूक मार्गदर्शन देऊ शकतात. आर्थिक सल्लागार, लेखापाल किंवा नियोजक हे तुम्हाला बजट, टॅक्स, इंवेस्टमेंट, सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन, अशा आर्थिक बाबींसाठी योग्य ते ज्ञान आणि मार्गदर्शन देतात.

सल्लागार तुम्हाला तुमचे आर्थिक ध्येय आणि अनुकूल परिस्थितीनुसार आर्थिक योजना विकसित करण्यास मदद ही करतात.

आर्थिक सल्लागारांसोबत काम केल्याने विविध आर्थिक स्रोतांबद्दल सखोल अभ्यास तुम्ही करू शकता आणि योग्य निर्णय घेऊन दीर्घकालीन यश ही तुम्हाला प्राप्त होते. तरुण व्यवसायिकांना त्यांचा आर्थिक पाया मजबूत करण्यास आणि स्वतःच्या आर्थिक क्षमता जाणून घेण्यासाठी आर्थिक सल्लागार प्रोत्साहित करतात. 

महत्वाचे मुद्दे :

वरील नमूद केलेल्या 10 पर्सनल फायनान्स टिप्स, आजच्या तरुण व्यवसायिकांना आर्थिक यश प्राप्तीसाठी मौल्यवान असे मार्गदर्शन देतात. लवकरात लवकर चांगल्या आर्थिक सवयी जसे की, बजट तयार करून त्याचे पालन करने, आपले आर्थिक ध्येय निश्चित करणे, पर्सनल फायनान्स बद्दल स्वतःला प्रशिक्षित करणे, गुंतवणूकीच्या विविध पर्यायांना निवडणे, विमा पॉलिसी घेणे, कमीम कमी कर्ज घेणे, इमर्जेन्सी फंड जमा करून ठेवणे, सेवा निवृत्ती नंतरच्या कालावधी साठी नियोजन करणे, क्रेडिट स्कोर चांगला ठेवणे आणि तो सुधारणे, सल्लागारांचे मार्गदर्शन घेणे, अशा सवयींना अंगभूत करून तुम्ही तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता.

Financial Planning Tips
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय पण रिफंड मिळालेला नाही? असा तपासा ऑनलाईन स्टेटस

ह्या टिप्स फक्त तुमचा आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी नव्हे, तर त्यासोबतच तुमचे व्यवसायिक आणि वैयक्तिक ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रता आणि आत्मविश्वास प्रदान करतात. तुमच्या पैशांवर नियंत्रण ठेऊन, महत्वाचे निर्णय घेतल्याने तुमचा आर्थिक विकास देखील होईल.

(किरांग गांधी हे एक अनुभवी आर्थिक मेंटोर आहेत, ज्यांना फायनान्स क्षेत्रात 25 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()