Lord Shri Krishna Teachings,  Financial Management, Personal Finance, Sakal Money, सकाळ मनी, श्रीकृष्ण
Lord Shri Krishna Teachings on Financial ManagementSakal Digital

Lord Krishna Teachings: कर्जाच्या जाळ्यात अडकायचे नाही ते भावनिक गुंतवणूक टाळणे; श्रीकृष्णांनी आर्थिक व्यवहारांबाबत काय म्हटलंय?

Shri Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन, हा केवळ उत्सव आणि भक्तीचा काळ नाही, तर त्यांच्या शिकवणींमध्ये अंतर्भूत असलेल्या कालातीत ज्ञानावर चिंतन करण्याची संधीदेखील आहे. भगवान श्रीकृष्णांनी आर्थिक व्यवहारांबाबत दिलेल्या तीन धड्यांबद्दल जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.
Published on

Lord Shri Krishna Teachings on Financial Management

किरांग गांधी

जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन, हा केवळ उत्सव आणि भक्तीचा काळ नाही, तर त्यांच्या शिकवणींमध्ये अंतर्भूत असलेल्या कालातीत ज्ञानावर चिंतन करण्याची संधीदेखील आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन आणि भगवद्‍गीता वैयक्तिक आर्थिक नियोजनासह जीवनाच्या विविध पैलूंबद्दल अनेक गोष्टी शिकण्याची संधी देतात. भगवान श्रीकृष्णांनी आर्थिक व्यवहारांबाबत दिलेल्या तीन धड्यांबद्दल जाणून घेणे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.

  • धर्म : आर्थिक जबाबदारी व नैतिकता

वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासंदर्भात (पर्सनल फायनान्स) धर्म म्हणजे तुमचा पैसा जबाबदारीने आणि नैतिकतेने हाताळणे.

  • कर्जाच्या जाळ्यात अडकायचे नाही

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अधर्माचा मार्ग टाळण्याचा सल्ला दिला, त्याचप्रमाणे हा सल्ला अनावश्यक कर्ज टाळण्यास सांगतो. क्रेडिट कार्ड आणि कर्जे सोयीस्कर असू शकतात. परंतु, कर्जांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास मोठा आर्थिक फटकाही बसू शकतो. त्यामुळे आपल्या गरजेनुसार जगणे आणि अति कर्ज घेण्याचा मोह टाळणे महत्त्वाचे आहे.

Lord Shri Krishna Teachings,  Financial Management, Personal Finance, Sakal Money, सकाळ मनी, श्रीकृष्ण
करदेयता प्रमाणपत्र
Loading content, please wait...