Layoffs: MS धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीने केली कर्मचारी कपात, काय आहे कारण?

Khatabook Layoffs: स्टार्टअप कंपनीने कर्मचारी कपात केली आहे.
Fintech start-up Khatabook lays off over 40 employees
Fintech start-up Khatabook lays off over 40 employees Sakal
Updated on

Khatabook Layoffs: मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीची प्रक्रिया सुरू आहे. भारतातही अनेक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सातत्याने कर्मचारी कपात होत आहे. आता आणखी एका फिनटेक स्टार्टअप कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. या कंपनीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचीही गुंतवणूक आहे.

बेंगळुरू स्थित फिनटेक कंपनी Khatabook ने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि विपणन विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

अहवालानुसार, खाताबुकने कपात केलेल्या कर्मचाऱ्यांनाही काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने तीन महिन्यांचा पगार दिला आहे. याशिवाय कंपनीने इन्शुरन्समध्येही मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की फिनटेक कंपनी खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Fintech start-up Khatabook lays off over 40 employees
Jet Airways: ट्रॅव्हल एजन्सीमध्ये नोकरी ते जेट एअरवेजचे मालक, नरेश गोयल असे अडकले ईडीच्या जाळ्यात

कंपनीने ही माहिती दिली

खाताबुक कंपनीने सांगितले की एकूण कर्मचाऱ्यांपैकी 6 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. कपात झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मदत पॅकेज देण्यात येणार आहे. कंपनीने ही कर्मचारी कपात खर्च कमी करण्यासाठी केली आहे असे सांगितले आहे.

Fintech start-up Khatabook lays off over 40 employees
Income Tax Notice: आयकर विभागाच्या नोटीशीमुळे करदाते चिंतेत, तुमच्याकडून ही चूक तर झाली नाही ना?

कंपनीत महेंद्रसिंग धोनीचीही गुंतवणूक

Khatabook ही एक फिनटेक स्टार्टअप कंपनी आहे, जी अॅपद्वारे कर्ज देण्याची सुविधा देते. कंपनीची स्थापना वैभव काळपे यांनी केली होती. नंतर 2018 मध्ये, Kite Technologies ने Khatabook विकत घेतले.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी खाताबुकचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. खाताबुकने सांगितले होते की एमएस धोनीनेही कंपनीत गुंतवणूक केली आहे. मात्र, गुंतवणुकीची नेमकी रक्कम कंपनीने सांगितलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.