Francoise Bettencourt Meyers
Francoise Bettencourt MeyersSakal

कोण आहेत फ्रँकोइस मेयर? ज्यांच्यासमोर सर्वात श्रीमंत अंबानींच्या संपत्तीचा डोंगरही ठेंगणा

Francoise Bettencourt Meyers: जगातील सर्वात श्रीमंत महिलेचा मुकुट फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर यांच्या डोक्यावर बराच काळ आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर झाली आहे
Published on

Francoise Bettencourt Meyers: जगातील सर्वात श्रीमंत महिलेचा मुकुट फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर यांच्या डोक्यावर बराच काळ आहे. आता त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलर झाली आहे आणि ही कामगिरी करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला आहेत.

सध्या त्या अब्जाधीश उद्योगपतींच्या यादीत 12व्या स्थानावर आहेत, म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा वर आहेत.

(First Woman With 100 Billion dollar Fortune, World's 12th Richest, Is Francoise Bettencourt Meyers)

फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर या जगातील सर्वात मोठी कॉस्मेटिक कंपनी L'Oreal च्या उपाध्यक्ष आहेत. गेल्या वर्षी L'Oreal ची विक्री 42 अब्ज डॉलर होती. या वर्षी कंपनीच्या शेअर्सनी सुमारे 34 टक्क्यांच्या वाढीसह विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Francoise Bettencourt Meyers
Ram Mandir: राम मंदिरामुळे व्यापाराला चालना; ५० हजार कोटींची उलाढाल होण्याचा ‘सीएआयटी’चा अंदाज

फ्रँकोइस बेटनकोर्ट मेयर आणि त्यांच्या कुटुंबाकडे L'Oreal मध्ये 34 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. L'Oreal च्या पोर्टफोलिओमध्ये Lancome आणि Garnier सारखे अनेक प्रसिद्ध ब्रँड आहेत. 2022 मध्ये कंपनीचा महसूल 41.9 अब्ज डॉलर होता. कंपनीच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे फ्रँकोइस यांच्या संपत्तीचा आलेखही वाढत आहे.

Francoise Bettencourt Meyers
Mutual Fund: म्युच्युअल फंड उद्योगाची लक्षणीय कामगिरी; मालमत्तेत १९ टक्के वाढ

L'Oreal ची सुरुवात दोन बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये झाली आणि आज त्यांची उत्पादने 150 देशांमध्ये निर्यात केली जातात. विशेष म्हणजे कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये संबंधित देशांनुसार बदल केले आहेत. सध्या कंपनीची सर्वात मोठी बाजारपेठ युरोप आहे.

कंपनीचे एकूण 36 ब्रँड आहेत आणि कंपनीत 88,000 कर्मचारी काम करतात. ही फ्रेंच कंपनी संशोधनावरही खूप लक्ष देते. सुमारे 4,000 शास्त्रज्ञ यासाठी काम करतात. कंपनीत 69% कर्मचारी महिला आहेत. म्हणजे L'Oreal महिलांना कामावर ठेवण्याला प्राधान्य देते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()