Fitch India GDP Forecast: भारतासाठी दिवाळीच्या काही दिवस आधी एक चांगली बातमी आली आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचने भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज वाढवला आहे. एजन्सीने सोमवारी ही माहिती दिली. एजन्सीचे म्हणणे आहे की भारताची अर्थव्यवस्था मध्यम कालावधीत 6.2 टक्के दराने वाढू शकते.
भारताबरोबरच 'या' देशाचाही अंदाज वाढला
ग्लोबल रेटिंग एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की आम्ही भारत आणि मेक्सिकोला मोठ्या प्रमाणावर अपग्रेड केले आहे. भारताचा विकास अंदाज 5.5 टक्क्यांवरून 6.2 टक्के आणि मेक्सिकोचा विकास अंदाज 1.4 टक्क्यांवरून 2 टक्के करण्यात आला आहे.
चीन, रशिया, कोरिया, दक्षिण आफ्रिकेचा आर्थिक विकास अंदाज कमी केला
फिचने चीनच्या वाढीचा अंदाज 5.3 टक्क्यांवरून 4.6 टक्के, रशियाचा 1.6 टक्क्यांवरून 0.8 टक्के, कोरियाचा 2.3 टक्क्यांवरून 2.1 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेचा विकासदर 1.2 टक्क्यांवरून 1.0 टक्क्यांवर कमी केला आहे.
फिचच्या मते, अलीकडच्या काही महिन्यांत भारतातील रोजगार दरात सुधारणा झाली आहे. फिचच्या मते, भारताच्या श्रम उत्पादकतेचा अंदाजही इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे.
फिचने सांगितले की, 10 उदयोन्मुख बाजारपेठेतील वाढीचा अंदाज पूर्वीच्या 4.3 टक्क्यांवरून आता 4 टक्के करण्यात आला आहे. फिचच्या मते, यामागचे कारण चीनच्या कमी संभाव्य वाढीचा अंदाज आहे.
10 उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चीनचा वाटा 57 टक्के आहे. चीनला वगळल्यास, 9 उदयोन्मुख बाजारपेठांसाठी सरासरी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 3.2 टक्के असू शकतो तर आधी तो 3 टक्के असण्याचा अंदाज होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.