Flipkart Empowering Dreams: फ्लिपकार्टमुळे मिळाले स्वप्नांना पंख

फ्लिपकार्टच्या धोरणांमुळे अनेक तरुणांना नव्या संधी मिळाल्या. फ्लिपकार्ट मुळे अनेक व्यक्तींनी ऑनलाइन कंपन्या सुरू केल्या आणि आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवले.
Flipkart Empowering Dreams
Flipkart Empowering Dreamsesakal
Updated on

वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या आयुष्याचा हरवलेला सूर शोधणाऱ्या आणि आयुष्याच्या अवखळ वारुवर मांड ठोकून स्वातंत्र्याच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आपले कम्फर्ट झोन्स सोडलेल्या व्यक्तींच्या असंख्य कहाण्या आहेत.

त्यातल्याच काही कहाण्यांमधील एक महत्त्वाचं पात्र आहे Flipkart

Flipkart द्वारे मिळालेल्या संसाधनांमुळे आणि पाठिंब्यामुळे अनेक व्यक्तींना स्वयंपूर्ण होण्यात मदत झाली आहे. त्यांनी मर्यादांचे उंबरठे ओलांडले, बदल स्वीकारले आणि स्वत:चे आणि त्यांच्या कुटुंबियांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी Flipkart द्वारे मिळालेल्या संधींचा लाभ घेतला आहे.

आशिका साध या मुंबईतील वकील आहेत. त्यांना महिला सक्षमीकरणासाठी काम करायचे होते. त्यांनी आपल्या करिअरचा मार्ग बदलला आणि त्या उद्योजक बनल्या. हुंडाबळी आणि महिला सबलीकरणाविषयक प्रकरणे हाताळल्यानंतर, आता आपण आपलं काहीतरी सुरू करायला हवं, या निष्कर्षाप्रत त्या पोहोचल्या.

2016 मध्ये आशिमाने Ashtag ही महिला कपड्यांची निर्मिती आणि निर्यात करणारी कंपनी सुरू केली. सुरुवातीला कंपनीत केवळ महिला कर्मचाऱ्यांना कामावर घेतले, ज्यामुळे Ashtag महिलाप्रधान व्यवसाय बनला.

आशिकाच्या डोळ्यासमोर व्यवसायासाठी दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. महिलांना अधिकाधिक नोकरीचे पर्याय उपलब्ध करून देणे जेणेकरून त्या सक्षम बनतील आणि दुसरे म्हणजे ऑफिसमध्ये वावरताना महिलांना आत्मविश्वास देतील अशा फॉर्मल कपड्यांची विक्री. या गोष्टी महिलांना प्रेरणा देऊ शकतात आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात, हे लक्षात आल्याने आशिकाला समाधान मिळाले.

संपूर्ण भारतात तिच्या ब्रँडची चांगली प्रसिद्धी होण्यासाठी आणि तो दिसत राहावा,ग्राहकांच्या नजरेसमोर राहावा, यासाठी आशिकाने ऑनलाइन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑनबोर्डिंगच्या सुलभ प्रक्रियेमुळे तिने फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर तिची उत्पादने विकण्याचा निर्णय घेतला. उत्पादन आणि निर्यातीच्या पूर्वीच्या अनुभवामुळे Ashtag ऑनलाइन मॉडेलवर सहजतेने जाऊ शकले. Flipkart ने विक्रेत्यांना मदत करण्यासाठी खाते व्यवस्थापक प्रदान केले आहेत. शिवाय उत्पादन विकास, विविधीकरण, विपणन, जाहिरात आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन अशा विविध व्यावसायिक कामांसाठी पाठिंबा दिला आहे.

Ashtag चा व्यवसाय जसजसा भरभराटीला आला, तसतसे आशिकाने तिच्या उत्पादनामध्ये पुरुषांचे कपडे आणि ट्रेंडी अॅक्सेसरीजचाही समावेश केला. शिवाय, तिने महिलांसोबत पुरुषांना काम देण्यास सुरुवात केली. जरी Ashtag आता आपली उत्पादने इतर वेबसाइट्सवर वितरीत करत असले तरी तिच्या उत्पादनातील मोठा वाटा अजूनही Flipkartकडूनच येतो.

फ्लिपकार्टवर ऑनलाइन विक्री सुरू केल्यापासून आशिकाच्या कंपनीला लखलखीत यश मिळालं आहे. त्याबद्दल ती अत्यंत आनंदी आहे.

बिग बिलियन डेज सारख्या उल्लेखनीय कार्यक्रमांदरम्यान आपल्या उत्पादनांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावर ती विशेषतः भर देते. आशिकाने निर्माण केलेल्या रोजगारांतून आणि तिच्या फर्ममधून तिला कामाचं समाधान लाभतं.

अर्थपूर्ण रोजगाराची निकड आणि आपल्या आवडीच्या विषयातच काम मिळण्याची स्वप्नं, करिअर बदलाची इच्छा असलेल्या तरुणांसाठी तिचा प्रवास मार्गदर्शक आहे.

साजिद उस्मानच्या बाबतीतही असेच आहे, एसएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मूळ रहिवासी असलेल्या साजिद उस्मानीला पुढील शिक्षण घ्यायचे होते पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्याने शिक्षण बाजूला ठेऊन मुंबईची वाट धरली आणि येथे काम शोधायला सुरूवात केली.

साजिद मुंबईत फ्लिपकार्ट किराणा भागीदार म्हणून नोकरी मिळवू शकला, त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याच्या नोकरीमुळे, तो त्याचे बिल भरण्यास, त्याच्या कुटुंबाला आधार देण्यास आणि त्याच्या गावी नवीन घर खरेदी करण्यास सक्षम आहे. साजिद आता त्याच्या कुटुंबासाठी जे चांगले जीवन देऊ शकतो त्याबद्दल त्याचे कुटुंबिय कौतुक आणि समाधान व्यक्त करतात.

sajid usman
sajid usman

साजिदचा भाऊ मुंबईत किराणा दुकान चालवतो आणि साजिद आपल्या भावाला लोकांच्या घरी किराणा सामान पोहोचवून मदत करत असे. तथापि, स्टोअरमधील पैसे त्यांच्या सर्व खर्चासाठी पुरेसे नव्हते. साजिदला एके दिवशी फ्लिपकार्ट किराणा कार्यक्रमाबद्दल कळले आणि फ्लिपकार्टचे अधिकारी विनायक जाधव यांच्याशी बोलल्यानंतर त्याने साइन अप करण्याचा निर्णय घेतला. जाधव यांनी त्याला तपशीलात माहिती दिली.

किराणा भागीदार म्हणून साइन अप करून साजिद आणि त्याचा भाऊ त्यांचे उत्पन्न वाढवू शकले आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली सुधारू शकले.

साजिद सांगतो की मीरा रोड हा त्याच्या माहितीचा विभाग असल्याने, त्याने तिथे डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निम्म्याहून अधिक डिलिव्हरी त्याच्या नियमित ग्राहकांच्याच घरी असतात. साजिद बिग बिलियन डेजची तुलना ईदच्या सणाशी करतो आणि उत्साहाने त्याची वाट पाहत आहे.

तो म्हणतो की त्याने काही काळासाठी फ्लिपकार्टचा वापर केला आहे आणि केवळ आश्चर्यकारक सवलतींसाठीच नव्हे तर त्याला अतिरिक्त पैसे कमविण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो विक्रीची वाट पाहत आहे. बिग बिलियन डेज दरम्यान मिळालेले अतिरिक्त पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि त्याची सध्याची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी वापरण्याची साजिदची इच्छा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.