Dunzo Crisis: कोण होणार डंझोचा नवा मालक? टाटा आणि झोमॅटोच्या स्पर्धेत 'या' कंपनीने मारली बाजी

Dunzo Flipkart Deal: फ्लिपकार्ट डंझो कंपनी खरेदी करण्यास उत्सुक आहे. टाटा आणि झोमॅटोनेही ही डिलिव्हरी कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. फ्लिपकार्ट आणि डंझो यांच्यात अजूनही चर्चा सुरू असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
Dunzo Crisis
Dunzo CrisisSakal
Updated on

Dunzo Delivery Company: फ्लिपकार्ट डंझो कंपनी खरेदी करण्यास उत्सुक आहे. टाटा आणि झोमॅटोनेही ही डिलिव्हरी कंपनी विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. फ्लिपकार्ट आणि डंझो यांच्यात अजूनही चर्चा सुरू असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

सध्या डंझोच्या मालकी संबंधित समस्यांमुळे या करारावर एकमत होत नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजने अद्याप या कराराला मान्यता दिलेली नाही, असे अहवालात म्हटले आहे. रिलायन्सने 2022 मध्ये डंझोमधील 26% स्टेक 200 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले होते. (Flipkart looking to buy mukesh ambani led reliance backed Dunzo)

डंझो कंपनीने नुकतीच कर्मचारी कपात केली आहे. नुकताच कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेल पाठवला होता. या मेलमध्ये कंपनीने म्हटले होते की, आम्ही 30 मार्च 2024 पर्यंत थकबाकीची रक्कम भरण्याचा प्रयत्न करत आहोत.

आम्ही तुम्हाला खात्री देतो की यापुढे पगाराबाबत कोणताही विलंब होणार नाही. गेल्या वर्षभरात कंपनीने आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची सर्व खाती बदलणे, बेंगळुरू कार्यालय रिकामे करणे किंवा बंद करणे या गोष्टींचा समावेश आहे.

Dunzo Crisis
SEBI: 'झी'चा पाय पुन्हा गोत्यात! कंपनीमध्ये 2,000 कोटींची हेराफेरी; शेअर्समध्ये झाली मोठी घसरण

डंझोसाठी मागचे वर्ष काही खास राहिले नाही. पैसे जमा करणे आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात त्यांना अडचणी येत आहेत. डंझोने आतापर्यंत बाजारातून 500 दशलक्ष डॉलर गोळा केले आहेत. कंपनीला आणखी पैसे मिळू शकत नाहीत. झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या ब्लिंकइटने डंझोचा बाजारातील बहुतांश हिस्सा हिसकावून घेतला आहे.

Dunzo Crisis
Upcoming IPO 2024: पैसे तयार ठेवा! अंबानी आणि टाटा गुंतवणूकदारांना करणार मालामाल; लवकरच IPO आणणार

डंझो कंपनी कबीर बिस्वास यांनी 2014 मध्ये अंकुर अग्रवाल, दलवीर सुरी आणि मुकुंद झा यांच्यासह स्थापन केली होती. कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, लाइटबॉक्स व्हेंचर्स आणि ब्लूम व्हेंचर्स यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.