Success Story: फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट् आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून कपड्यांपर्यंत सर्व वस्तू एका क्लिकवर येथे उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांच्या यशाबद्दल अनेकांना माहिती नाही.
सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे दोघे फ्लिपकार्टचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे होते.
जेव्हा सचिन आणि बिन्नी बन्सल आयआयटी दिल्लीतून उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू करण्याचा विचार केला. अनेकांना सचिन आणि बिन्नी भाऊ वाटतात पण तसे नाही. अर्थात त्यांचे आडनाव एकच आहे.
गुगलने दोनदा नोकरी नाकारली:
गुगलने बिन्नी बन्सल यांना दोनदा नोकरी नाकारल्यानंतर याची सुरुवात झाली. फ्लिपकार्टची सुरुवात ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून झाली.
बिन्नी आणि सचिन यांनी एकूण 2,71,000 रुपये जमा करून निधी तयार केला. अशा प्रकारे फ्लिपकार्टची स्थापना झाली.
गंमत म्हणजे अॅमेझॉनचीही अशीच सुरुवात झाली आणि नंतर सर्व वस्तू ऑनलाईन विकायला सुरुवात केली. फ्लिपकार्टने ऑनलाईन बुकस्टोअर म्हणूनही सुरुवात केली आणि भारतातील अॅमेझॉनची स्पर्धक बनली.
फ्लिपकार्ट पहिल्यांदा 2007 मध्ये बंगळुरूमध्ये एका छोट्या 2BHK फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आली होती. सचिनने फ्लिपकार्टचे सीईओ म्हणून काम सुरू केले. तर बिन्नीने वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाइटचे सीओओ पद स्वीकारले.
2012 मध्ये 150 दशलक्ष डॉलर उभारल्यानंतर, फ्लिपकार्ट लवकरच भारतातील दुसरी युनिकॉर्न कंपनी बनली. वॉलमार्टने कंपनीचे 77 टक्क्यांहून अधिक शेअर्स ताब्यात घेतल्यानंतर बिन्नी आणि सचिन या दोघांनीही कंपनी सोडली.
सर्वात मोठा करार:
वॉलमार्टने 16 अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक करारात फ्लिपकार्टचे 77 टक्के शेअर्स खरेदी केले. इंटरनेट फर्मशी संबंधित हा सर्वात मोठा करार झाला.
कॅश आऊट करून कंपनी सोडली तरीही सचिन आणि बिन्नी बन्सल अजूनही अब्जाधीश आहेत. सचिन बन्सल यांची एकूण मालमत्ता 1.3 अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात 10,648 कोटी रुपये आहे. बिन्नी बन्सल यांची एकूण संपत्ती 11,467 कोटी रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.