Nirmala Sitharaman Birthday: लंडनमधील सेल्सवुमन ते देशाच्या अर्थमंत्री असा आहे निर्मला सीतारामन यांचा प्रवास

FM Nirmala Sitharaman Birthday: 2003 ते 2005 या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या.
Nirmala Sitharaman Birthday
Nirmala Sitharaman BirthdaySakal
Updated on

FM Nirmala Sitharaman Birthday: अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 64 वर्षांच्या झाल्या. सेल्सवुमन ते देशाच्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप रंजक आहे.

निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात संरक्षण मंत्रीपदही भूषवले आहे, सप्टेंबर 2017 ते मे 2019 पर्यंत त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रीपद भूषवले आहे. यानंतर मे 2019 मध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना अर्थमंत्रीपद मिळाले.

18 ऑगस्ट 1959 रोजी जन्म

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी मदुराई, तामिळनाडू येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायण सीतारामन होते आणि ते रेल्वेत काम करत होते, तर सीतारामन यांची आई सावित्री सीतारामन गृहिणी होत्या.

तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात बीए केले. यानंतर त्यांनी 1984 मध्ये जेएनयूमधून मास्टर्स पूर्ण केले. इंडो-युरोपियन टेक्सटाइल ट्रेड या विषयावर त्यांनी पीएचडीही केली आहे.

लंडनमध्ये सेल्सवुमन म्हणून काम

निर्मला सीतारामन यांचा सेल्सवुमन होण्यापासून ते भारताच्या अर्थमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास रंजक आहे. लग्नानंतर त्या त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट झाल्या, तिथे त्यांनी रीजेंट स्ट्रीटमधील होम डेकोर स्टोअरमध्ये सेल्सवुमन म्हणून करिअरला सुरुवात केली.

यानंतर त्यांनी ब्रिटनमधील कृषी अभियंता संघटनेत सहाय्यक अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम केले. एवढेच नाही तर त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये पत्रकार म्हणूनही काम केले आहे.

Nirmala Sitharaman Birthday
ITR Filing: देशात महाराष्ट्र नंबर 1, आयकर रिटर्न भरण्यात 'या' राज्यांचा सर्वात जास्त वाटा

राजकीय कारकीर्दीची सुरुवात

सीतारामन 1991 मध्ये भारतात परतल्या आणि 2003 ते 2005 या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. यानंतर 2006 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पतीचे कुटुंब पूर्णपणे काँग्रेस समर्थक होते.

भाजपने निर्मला सीतारामन यांची पक्षाच्या प्रवक्त्यापदी नियुक्ती केली. पक्षाचा आवाज आणि चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. आंध्र प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आल्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

Nirmala Sitharaman Birthday
Air India Offer: टाटांची धमाकेदार ऑफर, रेल्वेच्या तिकीटात करता येणार विमान प्रवास, सेल फक्त काही दिवसांसाठी

संरक्षण मंत्रालय ते अर्थमंत्री असा प्रवास

मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामन यांची 3 सप्टेंबर 2017 रोजी देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यासह सीतारामन या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या दुसऱ्या पूर्णवेळ संरक्षण मंत्री बनल्या.

इंदिरा गांधी यांनी 1970 ते 71 या कालावधीत हे पद भूषवले होते. यानंतर 31 मे 2019 रोजी त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. सीतारामन यांनी 5 जुलै 2019 रोजी पहिला अर्थसंकल्प सादर केला. तेव्हापासून आतापर्यंत त्या देशाच्या अर्थमंत्री होत्या.

Nirmala Sitharaman Birthday
Petrol Price: पेट्रोल होणार स्वस्त, निवडणुकीच्या तोंडावर महागाई रोखण्यासाठी मोदींची 1 लाख कोटी रुपयांची योजना तयार

जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोर्ब्स 2021 च्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत सीतारामन 37व्या स्थानावर होत्या.

याशिवाय, फॉर्च्युनच्या रँकिंगच्या यादीत त्या देशातील सर्वात शक्तिशाली महिला आहेत. सीतारामन यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि त्यांच्याकडे शास्त्रीय गाण्यांचाही चांगला संग्रह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.