FMCG Products Price Hike: सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. चहा, बिस्किटे, तेल, शाम्पू यांसारख्या दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढू शकतात. उत्पादन खर्चात वाढ आणि अन्नधान्य महागाईमुळे जुलै-सप्टेंबर तिमाहीत FMCG कंपन्यांचे मार्जिन घसरले आहे.
त्याचा परिणाम शहरी भागातील वापरावर दिसू लागला आहे. यामुळे आता कंपन्या आपली उत्पादने जास्त किमतीत विकू शकतात. काही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेतही दिले आहेत.