Forbes Billionaires List 400: जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या अमेरिकेत आहे. सध्या फोर्ब्सच्या यादीतील टॉप 10 श्रीमंतांपैकी 9 अब्जाधीश हे अमेरिकेतील आहेत. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्था मंदीच्या समस्येचा सामना करत आहे. अलीकडेच अमेरिकेची अर्थव्यवस्था बंद पडण्यापासून वाचली आहे. मात्र, जगातील श्रीमंतांच्या यादीत अमेरिकन अब्जाधीशांचे वर्चस्व दिसून येते.
टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत कोण?
1. एलॉन मस्क
टेस्लाचे सीईओ आणि X चे मालक एलॉन मस्क हे जगातील पहिल्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एलॉन मस्क हे सहा कंपन्यांचे मालक आहेत.एलॉन मस्क 52 वर्षांचे आहेत आणि फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीनुसार, मस्कची एकूण संपत्ती 251 अब्ज डॉलर आहे.
2. जेफ बेझोस
59 वर्षीय जेफ बेझोस हे ई-कॉमर्स कंपनी Amazon चे संस्थापक आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 161 अब्ज डॉलर आहे. जेफ बेझोस हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील आहेत.
3. लॅरी एलिसन
ओरॅकलचे मालक लॅरी एलिसन यांची एकूण संपत्ती 158 अब्ज डॉलर आहे. 79 वर्षीय लॅरी एलिसन हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहेत.
4. वॉरन बफे
वॉरन बफे यांच्याकडे सध्या 121 अब्ज रुपयांची मालमत्ता आहे आणि ते बर्कशायर हॅथवेचे मालक आहेत. वॉरेन बफे हे 93 वर्षांचे असून ते अमेरिकेतील नेब्रास्का येथील आहेत.
5. लॅरी पेज
लॅरी पेज हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे 114 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 50 वर्षीय लॅरी पेज कॅलिफोर्निया, अमेरिकेतील आहेत.
6. बिल गेट्स
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 67 वर्षांचे असून ते जगातील 6व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. 111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक बिल गेट्स हे वॉशिंग्टन, अमेरिकेतील आहेत.
7. सर्जी ब्रिन
सर्जी ब्रिन हे जगातील 7व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते 110 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांचे वय 50 वर्षाचे आहे. ते कॅलिफोर्निया, अमेरिकेतील आहेत.
8. मार्क झुकरबर्ग
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत 8व्या क्रमांकावर असून त्यांचे वय 39 वर्षे आहे. ते 106 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. मार्क हे कॅलिफोर्निया,अमेरिकेचे आहे.
9. स्टीव्ह बाल्मर
स्टीव्ह बाल्मर हे जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असून त्यांचे वय 67 वर्षे आहे. 101 अब्ज डॉलर संपत्तीसह, ते टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत आहेत आणि ते कॅलिफोर्निया, अमेरिकेचे आहेत.
10. मायकेल ब्लूमबर्ग
मायकेल ब्लूमबर्ग हे जगातील 10व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असून त्यांचे वय 81 वर्षे आहे. 96.3 अब्ज डॉलर संपत्तीसह, ते टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत आहेत. ते न्यूयॉर्क, अमेरिकेचे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.