OpenAI मधून काढून टाकलेले सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये जाणार, सत्या नडेला यांची मोठी घोषणा

OpenAI CEO: कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी ही घोषणा केली आहे. ऑल्टमॅनसोबत ग्रेग ब्रॉकमनही मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत.
Former OpenAI CEO Sam Altman to join Microsoft, announces Satya Nadella
Former OpenAI CEO Sam Altman to join Microsoft, announces Satya Nadella Sakal
Updated on

OpenAI CEO: OpenAI मधून काढून टाकलेले CEO सॅम ऑल्टमन यांना नवीन पद मिळाले आहे. ते मायक्रोसॉफ्ट जॉईन करणार आहेत. कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी ही घोषणा केली आहे. ऑल्टमॅनसोबत ग्रेग ब्रॉकमनही मायक्रोसॉफ्टमध्ये सामील होणार आहेत.

ऑल्टमन आणि ब्रॉकमन मायक्रोसॉफ्टमध्ये नवीन प्रगत AI संशोधन टीमचे नेतृत्व करतील. OpenAI च्या बोर्डाने 17 नोव्हेंबर रोजी सह-संस्थापक आणि CEO सॅम ऑल्टमन यांना अचानक काढून टाकले. ओपनएआयच्या मते, ऑल्टमनच्या क्षमतेवर कंपनीला विश्वास नाही.

यानंतर ओपन एआयचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनीही राजीनामा दिला. तसेच, ऑल्टमनच्या बडतर्फीच्या काही तासांतच, तीन वरिष्ठ OpenAI संशोधक - जेकब पाचोकी, अलेक्झांडर मॅद्री आणि सिमोन सिडोर यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला.

ऑल्टमॅनच्या नियुक्तीची घोषणा करताना, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, "आम्ही OpenAI सोबतच्या आमच्या भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत आणि आमचा रोडमॅपवर विश्वास आहे.

Former OpenAI CEO Sam Altman to join Microsoft, announces Satya Nadella
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाचा तपास पूर्ण न केल्याबद्दल सेबीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका

आम्ही Emmett Shear आणि OAI च्या नवीन नेतृत्व टीमला जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आणि सॅम ऑल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन, सहकाऱ्यांसह, नवीन प्रगत AI संशोधन टीमचे नेतृत्व करण्यासाठी Microsoft मध्ये सामील होणार असल्याची बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही त्यांना त्यांच्या यशासाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी उत्सुक आहोत.''

सॅम ऑल्टमन यांना काढून टाकल्यानंतर, ओपनएआयच्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या बोर्डावर त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर ओपनएआयच्या बोर्डाने सीईओ म्हणून कंपनीत परत येण्यासाठी ऑल्टमनशी बोलणी सुरू केली होती. मात्र सत्या नडेला ऑल्टमनच्या संपर्कात होते. आता सत्या नडेला यांनी घोषणा केली की, सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्ट सोबत काम करणार आहेत.

Former OpenAI CEO Sam Altman to join Microsoft, announces Satya Nadella
World Cup 2023: फायनल सामना ठरला रेकॉर्ड ब्रेक; 'इतक्या' कोटी प्रेक्षकांनी घेतला आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()