Foxconn: फॉक्सकॉन कंपनीने PM मोदींना वाढदिवसाचे दिले खास गिफ्ट, भारतात होणार....

Foxconn Investment: फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे.
Foxconn aims to double jobs, investment in India over next 12 months
Foxconn aims to double jobs, investment in India over next 12 months Sakal
Updated on

Foxconn Investment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी लिंक्डइन पोस्ट केली आहे, फॉक्सकॉन येत्या बारा महिन्यांत भारतात त्यांची गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्याची योजना आखत आहे. फॉक्सकॉन ही आयफोनची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे.

फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना त्यांच्या 73व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ही घोषणा केली. फॉक्सकॉन कंपनीने आपल्या तामिळनाडू प्लांटमध्ये आधीच 40,000 कर्मचारी नियुक्त केले आहेत. व्ही ली यांनी रविवारी त्यांच्या घोषणेमध्ये रोजगारासंबंधित आकडेवारी जाहीर केली नाही.

Foxconn aims to double jobs, investment in India over next 12 months
‘जी-२०’ची फलनिष्पत्ती

फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे. कंपनीसाठी भारत ही एक नवीन बाजारपेठ आहे कारण कंपनीने भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादनांचा झपाट्याने विस्तार केला आहे. कंपनी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत आहे.

व्ही ली यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आदरणीय पंतप्रधान वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमच्या नेतृत्वाखाली फॉक्सकॉनची भारतात वेगाने वाढ झाली आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला वाढदिवशी मोठी भेट देण्यासाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करू.''

Foxconn aims to double jobs, investment in India over next 12 months
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरमधील 15 हजार घरांचे होणार लोकार्पण, कोणाला मिळणार लाभ?

गेल्या वर्षी रॉयटर्सने वृत्त दिले होते की फॉक्सकॉनने पुढील दोन वर्षांत आणखी 53,000 कामगारांची भरती करण्याची आणि भारतात सुमारे 70,000 कामगारांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे.

अहवालात भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांचा हवाला देण्यात आला होता. ऑगस्टमध्ये, कर्नाटकाने घोषणा केली की फॉक्सकॉन राज्यातील दोन प्रकल्पांमध्ये 600 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()