Success Story: रोज 30 रुपये कमावायचे, आज उभारलयं 17,000 कोटींचं साम्राज्य, असा आहे पंजाबच्या 'अंबानीं'चा प्रवास

राजिंदर गुप्ता यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Rajinder Gupta Success Story
Rajinder Gupta Success StorySakal
Updated on

Success Story: कधीकाळी 30 रुपये रोजंदारीवर काम करणारी व्यक्ती सुद्धा 17 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याचा मालक होऊ शकते, असे असे होऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही.

पण तसे झाले आहे आणि आज त्या व्यक्तीला पंजाबचा 'अंबानी' म्हणुन ओळखले जात आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून राजिंदर गुप्ता आहेत, जे देशातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत.

राजिंदर गुप्ता हे ट्रायडंट ग्रुपचे अध्यक्ष आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 12,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

राजिंदर गुप्ता हे पंजाबमधील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. राजिंदर गुप्ता यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या शिवाय चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयात नियामक मंडळाच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती झाली.

पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि हिमाचल प्रदेशच्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम करतात.

तसेच गुप्ता हे पंजाब ब्युरो ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशनच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये व्यापार, उद्योग आणि वाणिज्यचे प्रतिनिधी आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 9वी नंतर शिक्षण घेतले नाही. त्यानंतर त्यांना दिवसाला 30 रुपये पगारावर काम करावे लागले.

Rajinder Gupta Success Story
Gautam Adani: केंद्र सरकार अदानींवर मेहेरबान, RBIच्या नव्या नियमावलीवरून काँग्रेसचा हल्लाबोल

गुप्ता यांनी सिमेंटचे पाईप आणि मेणबत्त्या बनवून व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यासाठी त्यांना दिवसाला 30 रुपये मिळायचे. 1980 च्या दशकात त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि 1985 मध्ये अभिषेक इंडस्ट्रीजची स्थापना केली.

त्यानंतर त्यांनी 1991 मध्ये संयुक्त उपक्रमात सूतगिरणी सुरू केली, त्यातून भरघोस कमाई झाली. त्यानंतर गुप्ता यांनी पंजाबमध्ये त्यांच्या व्यवसायाचे रूपांतर केले आणि टेक्सटाईल, पेपर आणि केमिकल क्षेत्रात त्यांची कंपनी जागतिक स्तरावर पोहचवली.

आता गुप्ता यांच्या ट्रायडेंट ग्रुपच्या ग्राहकांमध्ये वॉलमार्ट, जेसीपेनी, लक्झरी आणि लिनन्स यांचा समावेश आहे. कौटुंबिक आणि आरोग्याचे कारण देऊन, 64 वर्षीय गुप्ता यांनी 2022 मध्ये ट्रायडंटच्या संचालक मंडळातून पायउतार झाले परंतु ते लुधियाना येथे मुख्यालय असलेल्या समूहाचे 'अध्यक्ष एमेरिटस' राहिले आहेत.

Rajinder Gupta Success Story
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.