SBI Chairman Interview: SBI चेअरमन पदाची मुलाखत अचानक रद्द, काय आहे प्रकरण?

SBI Chairman Interview: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI च्या नवीन अध्यक्षांची मुलाखत काही तासांपूर्वी पुढे ढकलण्यात आली आहे. या मागचे कारण काय होते हे अद्याप कळू शकलेले नाही.
FSIB defers interview for SBI chairman's post, new date after poll results
FSIB defers interview for SBI chairman's post, new date after poll results Sakal
Updated on

SBI Chairman Interview: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच SBI च्या नवीन अध्यक्षांची मुलाखत काही तासांपूर्वी पुढे ढकलण्यात आली आहे. या मागचे कारण काय होते हे अद्याप कळू शकलेले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या संचालकांचा शोध घेणाऱ्या FSIB या कंपनीने हा निर्णय घेतला आहे. देशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुलाखतीची नवी तारीख निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या, दिनेश खारा हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत, ते 28 ऑगस्ट 2024 रोजी वयाची 63 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या पदावरून निवृत्त होतील. एसबीआयच्या अध्यक्षपदासाठी कमाल वय मर्यादा 63 वर्षे आहे. आतापर्यंत, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करणाऱ्या लोकांमधून एसबीआयचे अध्यक्ष नियुक्त केले जात होते.

मुलाखतीनंतर, वित्तीय सेवा संस्था ब्युरो त्यांच्या निवडक नावांशी संबंधित सूचना सरकारला सादर करते, ज्यावर अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नेमणुकांवरील कॅबिनेट समिती घेते.

FSIB defers interview for SBI chairman's post, new date after poll results
Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

अहवालानुसार, या पदासाठी आघाडीवर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे तीन व्यवस्थापकीय संचालक आहेत - सी.एस. शेट्टी, अश्विनीकुमार तिवारी आणि विनय एम. टोणसे. बँकेचे चौथे व्यवस्थापकीय संचालक आलोक कुमार चौधरी या वर्षाच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत.

FSIB defers interview for SBI chairman's post, new date after poll results
Raghuram Rajan: 'भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल पण...', RBIचे माजी गव्हर्नर यांनी व्यक्त केली चिंता

SBI ने चमकदार कामगिरी केली

स्टेट बँक ऑफ इंडियाने चौथ्या तिमाहीत 23.98 टक्के वाढीसह 20,698 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी हा नफा 16,695 कोटी रुपये होता. या तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न 19.46 टक्क्यांनी वाढून 1.11 लाख कोटी रुपये झाले आहे. SBI चा FY24 चा ऑपरेटिंग नफा वार्षिक 12.05 टक्क्यांनी वाढून 93,797 कोटी झाला आहे; आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा 16.76 टक्क्यांनी वाढून 28,748 कोटी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.