Fuel Credit Card : पेट्रोल-डिझेल मिळणार मोफत, इंडियन ऑइल आणि कोटक महिंद्राने फ्युएल क्रेडिट कार्ड केले लाँच

इंडियन ऑइलने कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने नवीन इंधन क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.
Fuel Credit Card
Fuel Credit CardSakal
Updated on

Fuel Credit Card : इंडियन ऑइलने कोटक महिंद्रा बँकेच्या सहकार्याने नवीन इंधन क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या कार्डच्या मदतीने तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी बक्षीस मिळेल, ज्याचा वापर करून तुम्ही इंधनावर सूट मिळवू शकता किंवा पैसे वाचवू शकता.

कोटक महिंद्रा बँकेचे ग्राहक कोणत्याही इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर हे कार्ड वापरून रिवॉर्ड पॉइंट मिळवू शकतात. जर तुम्ही तुमच्या जवळ जास्त रिवॉर्ड पॉइंट्स गोळा केले तर तुम्हाला पेट्रोल देखील मोफत मिळू शकते. मात्र, त्या पेट्रोलच्या किंमतीएवढेच पेट्रोल-डिझेल मिळेल.

500 रुपयांपर्यंत मासिक सवलत :

जर तुम्ही या क्रेडिट कार्डच्या मदतीने इंधन भरले तर तुम्हाला दरमहा 300 रुपयांपर्यंत बक्षिसे मिळू शकतात. मात्र, हे इंधन तुम्हाला इंडियन ऑईल स्टेशनवरच भरावे लागेल.

दुसरीकडे, मासिक 200 रुपये किंवा किराणा सामान, रेस्टॉरंट आणि इतर वस्तूंच्या खरेदीवर 2% सूट मिळवू शकता.

स्मार्ट ईएमआय सुविधा :

त्याचबरोबर अतिरिक्त शुल्कात सूट दिली जाईल. अतिरिक्त शुल्कावर 1% सूट देऊन, तुम्हाला 100 रुपयांपर्यंत मासिक सवलत मिळू शकते. 48 दिवसांसाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाईल. स्मार्ट ईएमआय सुविधा उपलब्ध आहे.

Fuel Credit Card
Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; चांदीची चकाकीही वाढली, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

इंडियन ऑइल ही जगातील सर्वात मोठी इंधन पुरवठा कंपनी :

इंडियन ऑइल ही जगातील सर्वात मोठी इंधन पुरवठा करणारी कंपनी आहे, ज्याची देशभरात 34 हजार ऑइल स्टेशन आहेत.

व्यवसायात आणखी वाढ करण्यासाठी आणि ऑनलाइन प्रचार करण्यासाठी, कंपनीने इंधन क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. रुपे प्लॅटफॉर्मवर इंधन क्रेडिट कार्ड लाँच करण्यात आले आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रमुख राजीव पिल्लई यांनी सांगितले आहे की कोटक महिंद्रा आणि इंडियन ऑइलच्या रुपे क्रेडिट कार्डला विशेषाधिकार दिला जाईल.

Fuel Credit Card
देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.