‘जी-२०’ची फलनिष्पत्ती

‘जी-२०’ परिषदेमध्ये मार्गी लागलेला सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे भारत-पश्‍चिम आशिया-युरोप यांना जोडणारा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’.
g-20 summit economic corridor What achieved what will benefit country
g-20 summit economic corridor What achieved what will benefit countrySakal
Updated on

- गोपाळ गलगली

देशाच्या राजधानीत जगातील २० प्रमुख देशांची ‘जी-२०’ ही परिषद नुकतीच पार पडली. या देशाच्या पंतप्रधानांची आणि त्यांच्याबरोबर आलेल्या राजकीय मुत्सद्यांच्या अनेक बैठकी पार पडल्या. यातून नेमके काय निष्पन्न झाले किंवा याचा काय फायदा देशाला होणार याचा विचार केल्यास, असे दिसून येईल, की येत्या काळात भारतात सुधारणांची ‘त्सुनामी’ येईल.

ही ‘त्सुनामी’ प्रामुख्याने मूलभूत गरजा भागविण्याऱ्या क्षेत्रांमध्ये येईल. मालवाहतुकीसाठी गरज असणारे रस्ते, बंदरे, विमाने, वाहन उद्योग अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात सरकारची मोठी गुंतवणूक आहे.

भारत-पश्‍चिम आशिया-युरोप कॉरिडॉर

या ‘जी-२०’ परिषदेमध्ये मार्गी लागलेला सर्वांत महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे भारत-पश्‍चिम आशिया-युरोप यांना जोडणारा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’. यामुळे भारत आणि युरोपमधील व्यापार ४० टक्के जलद गतीने होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी याच्याशी निगडित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पायाभूत सुविधांसह वाहन आदी क्षेत्रांमधील कोणत्या कंपन्या भरभराटीला येण्याची शक्यता आहे, याचा अभ्यास जरूरीचा ठरणार आहे.

(निकषः कंपन्यांची निवड करताना त्यांची आतापर्यंतची कामगिरी आणि भविष्यातील प्रगतीची शक्यता याचा अंदाज घेतला आहे. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’वर नोंदलेल्या शेअरचाच विचार केला आहे.)

रेल्वे क्षेत्र

कंपनीचे नाव - सध्याचा भाव/उच्चांकी भाव- तीन वर्षांतील परतावा (%) -तीन वर्षांतील वाढ(विक्री/नफा %)

आयआरसीटीसी -६९६/७७४ -१५५- २५/३८

कंटेनर काॅर्पोरेशन -७१९/८२९ -८७ -१२/७७

रेल विकास -१६९/१९९ -६९० -१८/२८

रेलटेल -२२६/२५५ -७१ -३४/१६

आयआरएफसी -८०/९२ -२४६ -३१/३१

इरकॉन -१५०/१७४ -२५५ -३९/२७

रिट्स -५२४/५८४ -१०९ -३/५

(याशिवाय बीईएमएल, टिटाघर, टेक्समॅको आदी)

विमान कंपन्या

इंटरग्लोब (इंडिगो) -२४६४/२७४५ -८६ -२३/१४

जेट एअरवेज -५५/१०३ -१०० -६१/४१

स्पाइसजेट -३८/४६ -२८ -१५/२७

ग्लोबल व्हेक्ट्रा -७९/९६ -३७ -५/३

(याशिवाय विस्तारा, गो फर्स्ट आदी)

रस्ते

एल अँड टी -२९१४/३००० -२२३ -१२/११

आयआरबी इन्फ्रा -३३/३५ -१६५ -३/६

इंजिनीअर इंडिया -१४७/१६७ -११२- १/११

पीएनसी इंडिया -३६४/३७२ -१२०- १९/१०

केएनआर -२७२/२८७ -१०५-२८/३४

एचजी इन्फ्रा -९६३/१०१९ -३८६ -४४/७०

अशोका बिल्डकॉन -१०७/११६ -५० -२६/५८

एनसीसी -१४९/१७६ -३५० -३२/४०

दिलीप बिल्डकॉन -३१२/३४८- १७ -५/९४

(याशिवाय एचसीसी, जीआर इन्फ्रा, टाटा प्रोजेक्ट आदी.)

जहाज कंपन्या

ग्रेट ईस्टर्न -८१२/८६४ -२०८ -२४/२५२

शिपिंग काॅर्पोरेशन -१४५/१६४ -१५२ -१४ /६३

कोचिन शिपयार्ड -१०८६/१२५८ -२२३ -१६/३०

एस्सार शिपिंग -१४/१५ -५० -७८/१

श्रेयस शिपिंग -३६३/३६५ -४२० -११/८५

माझगाव डॉक -२०९८/२४८४ -७३९ -२६/६२

अदानी पोर्ट -८४६/९८७ -१४०- ३२/१९

(याशिवाय वरुण शिपिंग, एबीजी, पिपावाव आदी)

ट्रक कंपन्या

टाटा मोटर्स -६३४/६६५ -३२७ -१५/ ५४

महिंद्रा अँड महिंद्रा -१६०१/१६१० -१६०- २७/१४२

आयशर -३४३१/३८८९ -६० -२६/२०

अशोक लेलॅंड -१८३/१९१ -१३५- ३८/७२

फोर्स मोटर्स -३७९३/४००१- २३३-- २८/६१

एस्एम इसूझू -१२१३/१४०१ -१८७ -२६/३

(याशिवाय डेमलर इंडिया, व्होल्वो आदी)

याशिवाय टीसीआय, व्हीआरएल्, पटेल इंजिनीअरिंग, श्रीराम ट्रान्सपोर्ट आदी मालवाहतूक कंपन्यांवरही लक्ष ठेवायला हवे.

सारांश : वर उल्लेखलेल्या कंपन्यांशिवाय कोणतीही कंपनी माल

आणि सेवा यांची वाहतूक करत असेल, तर तिचाही समावेश पायाभूत सुविधा क्षेत्रात येऊ शकेल. याचाच अर्थ आयटी, मोबाईल सेवा कंपन्यादेखील या क्षेत्रात येतील.

(लेखक ज्येष्ठ शेअर बाजारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()