Smriti Irani
Smriti Irani Sakal

''अमेरिकन उद्योगपती सोरोस याचं विधान म्हणजे भारतीय...'' मोदींवरील टिप्पणीवर भाजपचा संताप

अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला आहे.
Published on

Gautam Adani News : अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला आहे. जॉर्ज सोरोस यांनी भारताच्या लोकशाहीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला असून पंतप्रधान मोदी हे त्यांचे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या.

स्मृती इराणींनी जॉर्ज सोरोसवर साधला निशाणा :

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या की, '' जॉर्ज सोरोसच्या केंद्रस्थानी असलेल्या परदेशी शक्तीने घोषित केले आहे की, ते भारताच्या लोकशाही संरचनेवर हल्ला करतील आणि पंतप्रधान मोदींना त्यांच्या हल्ल्याचा मुख्य मुद्दा बनवतील.''

आमचे सरकार जनतेसाठी असल्याचे स्मृती इराणी म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, ''याआधीही आम्ही परदेशी शक्तींचा पराभव केला आहे. देशाविरुद्धचे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही.''

Smriti Irani
YouTube CEO : पहिली सॅलरी 2 लाख, बोनस चक्क 544 कोटी, पहा युट्यूबच्या CEO चा गुगलमधला प्रवास

जॉर्ज सोरोस पंतप्रधान मोदींवर निशाणा :

स्मृती इराणी म्हणाल्या की, ''जॉर्ज सोरोस यांना त्यांच्या नापाक योजना यशस्वी करण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार सरकार हवे आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसारख्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी एक अब्ज डॉलरहून अधिक निधी देण्याची घोषणा केल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.''

कोण आहेत जॉर्ज सोरोस :

जॉर्ज सोरोस हे अमेरिकन व्यापारी आहेत. त्यांनी पीएम मोदींवर क्रोनी कॅपिटलिझमला  प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आणि दावा केला की, त्यांचे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

जर्मनीतील म्युनिक सुरक्षा परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. जॉर्ज सोरोस यांनी अदानी समूहाच्या कथित हेराफेरीत पंतप्रधान मोदींचा हात असल्याचा आरोपही केला होता. ज्यावर भाजपने आता प्रत्युत्तर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()