Gautam Adani Net Worth: गौतम अदानी यांच्यासाठी गेले काही दिवस चांगले गेले आहेत कारण त्यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती ठरले आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची एकूण संपत्ती एका दिवसात 12.3 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 1,91,62,33,50,000 रुपयांनी वाढली आहे. यासह अदानी एका दिवसात सर्वाधिक कमाईच्या बाबतीत नंबर 1 अब्जाधीश बनले आहेत.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सोमवारी गौतम अदानी यांनी एका दिवसात 4 बिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई केली होती, तर मंगळवारी त्यांनी अवघ्या 24 तासात तब्बल 12.3 अब्ज डॉलर कमावले. अदानींच्या एका दिवसातील कमाईचा हा आकडा इलॉन मस्कपासून बर्नार्ड अर्नॉल्टपर्यंतच्या टॉप-3 अब्जाधीशांच्या कमाईपेक्षा जास्त आहे.
गौतम अदानी यांनी अवघ्या एका आठवड्यात 4 स्थानांची झेप घेतली आहे. आता मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत जे गौतम अदानींच्या वर आहेत. 91.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मुकेश अंबानी 13 व्या क्रमांकावर आहेत.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्याचा फायदा
गेल्या आठवड्यापासून अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. गेल्या 6 सत्रांवर नजर टाकली तर अदानी ग्रुपच्या मार्केट कॅपमध्ये 5.6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, ग्रुपचे एकूण मार्केट कॅप 15 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. त्यामुळेच गौतम अदानी यांच्या संपत्तीत एवढी मोठी वाढ झाली आहे.
अदानी समूहाचे शेअर्स का वाढत आहेत?
या वर्षाच्या सुरुवातीला गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि गौतम अदानी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 25 व्या स्थानावर घसरले.
पण सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सेबीने हिंडेनबर्गच्या अहवालात तथ्य नसल्याचा दावा केला. हा अदानी समूहासाठी दिलासा देणारा निर्णय होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी संपली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.
अमेरिकेने अदानी पोर्ट्सवर केलेले फसवणूकीचे आरोपही चुकीचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अदानी समूहावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.