Adani Group Building Ships: उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी पोर्ट सध्या देशातील सर्वात मोठी बंदर व्यवस्थापन कंपनी आहे. हीच कंपनी भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर मुंद्रा बंदराचे व्यवस्थापन करते. मात्र आता गौतम अदानी यांनी पुढे जाऊन देशातच जहाज बांधण्याची मोठी योजना आखली आहे.
अदानी समूहाने मुंद्रा बंदरातच जहाजे बांधण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. याचे कारण म्हणजे चीन, दक्षिण कोरिया आणि जपान सारख्या देशांमध्ये 2028 पर्यंत नवीन जहाजे बांधता येणार नाहीत, कारण येथील मोठे शिपयार्ड 2028 पर्यंत पूर्णपणे बुक केलेले आहेत. अशा परिस्थितीत, जागतिक कंपन्या नवीन जहाजे तयार करण्यासाठी भारतासह इतर उत्पादन साइटवर लक्ष केंद्रित करत आहेत.
अदानी समूहाने जहाजबांधणी व्यवसाय सुरू केल्याची बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा संपूर्ण जग कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी ग्रीन शिपकडे वाटचाल करत आहे. यामुळे जगभरातील जहाजांचा ताफा बदलावा लागणार असून संपूर्ण जगाची जहाजे बदलण्यासाठी पुढील 30 वर्षांत सुमारे 50,000 जहाजांचा पुरवठा करावा लागणार आहे.
सध्या भारतात जहाजे बांधण्यासाठी 8 सरकारी आणि 20 खाजगी शिपयार्ड आहेत. यामध्ये चेन्नईजवळील लार्सन अँड टुब्रोचे कट्टुपली शिपयार्ड आणि सरकारचे कोचीन शिपयार्ड यांचा समावेश आहे.
सध्या जहाजबांधणीच्या बाबतीत भारत हा जगातील विसाव्या क्रमांकाचा देश आहे. जागतिक व्यावसायिक जहाजबांधणी बाजारपेठेत भारताचा वाटा फक्त 0.005 टक्के आहे. तर सरकारने आपल्या 'मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030' मध्ये भारताला या बाबतीत टॉप-10 मध्ये स्थान देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
'विकसित भारत 2047' च्या 'मेरिटाइम अमृत काल व्हिजन'मध्ये हे लक्ष्य टॉप-5 ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत गौतम अदानी यांचे हे पाऊल सरकारचे हे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, अलीकडेच मुंद्रा बंदराला विस्तारासाठी पर्यावरण आणि इतर नियमांशी संबंधित मंजुरी मिळाली आहे. मात्र, यावर अदानी समूहाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.