Vibrant Gujarat Summit 2024: गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये आजपासून व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट सुरू झाली आहे. 10 ते 12 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या जागतिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रात्रीच गांधीनगरला पोहोचले होते.
या गुजरात व्हायब्रंट समिटमध्ये अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, आम्ही 5 वर्षात गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. ते म्हणाले की आम्ही कच्छमध्ये जगातील सर्वात मोठे ग्रीन पार्क तयार करू आणि गुजरातमध्ये 1 लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करून देऊ.
गौतम अदानी म्हणाले की, आम्ही गेल्या शिखर परिषदेत 55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन दिले होते आणि आतापर्यंत 50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. ते म्हणाले की, आम्ही कच्छमध्ये 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले 30 GW क्षमतेचे ग्रीन एनर्जी पार्क बनवत आहोत, जे अंतराळातूनही दिसेल.
2003 मध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची सुरूवात
गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 वर्षांपूर्वी 2003 मध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची सुरूवात केली होती. यावेळी व्हायब्रंट गुजरात समिट आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत @2047 च्या व्हिजनला पुढे नेईल.
या समिटमध्ये 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्था शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. ज्यामध्ये जगातील अनेक मोठे नेते, पंतप्रधान आणि जगातील मोठ्या कंपन्यांचे सीईओ सहभागी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.