Gautam Adani: पवारांची फॅमिली अदानी कुटुंबासोबत ट्रीपवर जाते तेव्हा... गौतम अदानी यांनी सांगितलेली आठवण

Sharad Pawar and Adani Friendship: उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. जेव्हा अदानी कोळसा क्षेत्रात विस्तार करण्याच्या संधी शोधत होते तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली होती.
Sharad Pawar and Adani Friendship
Sharad Pawar and Adani FriendshipSakal
Updated on

Sharad Pawar and Adani Friendship: उद्योगपती गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मैत्री सर्वांनाच माहित आहे. जेव्हा अदानी कोळसा क्षेत्रात विस्तार करण्याच्या संधी शोधत होते तेव्हा शरद पवारांनी त्यांना मदत केली होती.

2015 मध्ये प्रकाशित झालेल्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रात पवारांनी अदानी यांचे कौतुक केले असून, त्यांना पायाभूत सुविधा क्षेत्रात काहीतरी मोठे करण्याची महत्त्वाकांक्षा असणारा कष्टाळू, साधा-सरळ माणूस म्हणून संबोधले आहे . त्यांच्या विनंतीवरूनच अदानी औष्णिक ऊर्जा क्षेत्रात उतरल्याचेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिले आहे.

शरद पवारांनी पुस्तकात नेमक्या कोणत्या गोष्टी सांगितल्या?

शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात मुंबई लोकल ट्रेनमध्ये सेल्समन म्हणून काम करण्यापासून सुरुवात करून अदानींनी आपले मोठे व्यावसायिक साम्राज्य कसे उभे केले ते लिहिले आहे.

अदानी यांनी हिरे उद्योगात नशीब आजमावण्यापूर्वी छोट्या उद्योगांमध्ये हात आजमावला, असेही पवारांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लिहिले की, “ गौतम हिऱ्यांच्या व्यवसायात चांगली कमाई करत होते पण गौतम यांना त्यात रस नव्हता.

Sharad Pawar and Adani Friendship
Sharad Pawar : राजकारणात महिलांची संख्या वाढायला हवी - शरद पवार

पायाभूत सुविधा क्षेत्रात पदार्पण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते आणि त्यांनी मुंद्रा येथे बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.''

पवार यांनी अदानींना हे बंदर पाकिस्तानच्या सीमेजवळ असून ते कोरडे ठिकाण असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले, "प्रतिकूल परिस्थिती असूनही, अदानी यांनी आव्हान स्वीकारले."

पवारांच्या सूचनेवरून अदानी ऊर्जा क्षेत्रात उतरले

शरद पवारांनी लिहिले की, नंतर अदानी कोळसा क्षेत्रात उतरले आणि त्यांच्या (पवारांच्या) सूचनेनुसार उद्योगपती औष्णिक ऊर्जा क्षेत्रात उतरले. त्यावेळी केंद्रीय कृषिमंत्री असलेले पवार यांनी महाराष्ट्रातील गोंदिया येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अदानी यांना या सूचना दिल्याचे सांगितले.

शरद पवारांनी लिहिले, “गौतम यांनी त्यांच्या भाषणात माझी सूचना मान्य केली. सामान्यत: मंचावरून केलेली विधाने काही विशेष ठरत नाहीत, पण गौतम यांनी या दिशेने वाटचाल केली आणि भंडारा येथे 3,000 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारला.'' पुस्तकात पवारांनी त्यांच्या अनेक दशकांचा राजकीय कार्यकाळात कसा घालवला, याची आठवण करून दिली. या काळात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक उद्योगपतींशी जवळचे संबंध निर्माण केले.

पवारांनी अदानींना बारामती भेटीचं निमंत्रण दिलं तेव्हा...

गौतम अदानी यांनी 'सकाळ'साठी लिहिलेल्या लेखात शरद पवारांच्या मैत्रीबद्दल लिहिले आहे. त्यांनी लेखात म्हटले आहे की, ''आम्ही पवार कुटुंबीयांबरोबर ट्रिपला गेलो होतो. त्या वेळी सर्वजण आपापल्या गाडीत व्यवस्थित बसले आहेत ना, याची खात्री करूनच ते स्वतः गाडीत बसले.

Sharad Pawar and Adani Friendship
Gautam Adani Birthday: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, 106 अब्ज डॉलर्सची संपत्ती, जाणून घ्या गौतम अदानींचा पगार किती?

रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर प्रत्येकाला बसायला जागा मिळाली आहे, याची खात्री करूनच ते स्वतः स्थानापन्न झाले. या गोष्टी छोट्या वाटल्या, तरी त्यातून पवारांची दृष्टी दिसते.''

पुढे त्यांनी लिहिले की, ''सुमारे दहा वर्षांपूर्वी पवारांनी मला बारामती भेटीचं निमंत्रण दिलं होतं. पवारांनी सुमारे दोन तास आपुलकीनं व आदरानं आम्हाला ‘त्यांची’ बारामती दाखवली. एखाद्या नेत्यानं जर मनापासून प्रयत्न केले, तर त्याच्या मतदारसंघाचा किती विकास होऊ शकतो आणि त्याचा लोकांना किती लाभ होऊ शकतो, हे मला तिथे दिसून आलं.

गेल्या काही वर्षांच्या आमच्या परिचयातून मला आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली. ती म्हणजे पवारांचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्या माणसांच्या मागे ते नेहमी भक्कमपणे उभे राहतात. त्या माणसांच्या पडत्या काळातही ते त्यांना साथ देतात.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.