Gautam Adani: गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत झाली 4,54,73,57,37,500 रुपयांची वाढ

Gautam Adani Vs Mukesh Ambani: शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 5.45 अब्ज डॉलर्स म्हणजेच 45 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
Gautam Adani net worth
Gautam Adani net worth Sakal
Updated on

Gautam Adani Vs Mukesh Ambani: श्रीमंतांच्या यादीत भारतातील दोन उद्योगपतींमध्ये शर्यत सुरूच आहे. या यादीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला आहे. गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात मोठा बदल झाला आहे. गौतम अदानी यांनी श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत त्यांनी नंबर 1 चे पद पटकावले आहे.

111 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानी या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. यासह ते आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. शुक्रवारी, अदानींची एकूण संपत्ती 5.45 अब्ज डॉलरने वाढली, यासह त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर झाली.

शुक्रवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत 5.45 अब्ज डॉलर्स म्हणजेच 45 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Gautam Adani net worth
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट; DA नंतर आता वाढली ग्रॅच्युइटीची मर्यादा

मुकेश अंबानींची संपत्ती

दुसरीकडे, मुकेश अंबानी या यादीत 12 व्या स्थानावर आणि 109 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आशियातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. शुक्रवारी त्यांची एकूण संपत्ती 26.8 अब्ज डॉलरने वाढली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे जगातील 11 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. दुसरीकडे मुकेश अंबानी आता 12 व्या स्थानावर आले आहेत.

शुक्रवारी जगातील टॉप 12 अब्जाधीशांपैकी केवळ 3 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. ज्यामध्ये इलॉन मस्क, जेफ बेझोस आणि लॅरी ॲलिसन यांच्या नावांचा समावेश आहे. जेफ बोस यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट झाली आहे. ॲमेझॉनचे संस्थापक बेझोस यांच्या संपत्तीत 2.75 अब्ज डॉलरची घट झाली आहे आणि एकूण संपत्ती 199 अब्ज डॉलर्स झाली आहे.

Gautam Adani net worth
India GDP: यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 8.2 टक्के राहणार - Govt data

इलॉन मस्कबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या संपत्तीत 493 दशलक्ष डॉलर्सची घट झाली आहे. सध्या इलॉन मस्कची संपत्ती 203 अब्ज डॉलर्स आहे. तर लॅरी एलिसनच्या संपत्तीत 21.7 दशलक्ष डॉलर्सची किंचित घट झाली आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 132 अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.