Adani on Hindenberg Report : आमची बदनामी करण्यासाठी हिंडेनबर्गने दिला होता चुकीचा रिपोर्ट - गौतम अदानी

हिंडेनबर्गच्या या रिपोर्टमुळे अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते.
Adani on Hindenberg Report
Adani on Hindenberg ReporteSakal
Updated on

भारतातील मोठे व्यावसायिक गौतम अदानी यांनी हिंडनबर्ग रिपोर्टवर आपलं मत मांडलं आहे. अमेरिकेतील शॉर्ट-सेलर कंपनी असलेल्या हिंडनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर ताशेरे ओढले होते. यामुळे अदानींच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कोसळली होती.

मंगळवारी अदानी एंटरप्रायझेसच्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना, अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी याबाबत आपलं मत मांडलं. "हा रिपोर्ट आपल्या कंपनीची बदनामी करण्यासाठी देण्यात आला होता. यामधील माहिती आणि आरोप चुकीचे होते. आपल्या कंपनीची रेप्युटेशन खराब करून त्यामार्फत नफा कमावण्याचं उद्दिष्ट या कंपनीचं होतं", असं अदानी म्हणाले.

२४ जानेवारी रोजी हिंडनबर्ग समूहाने अदानी ग्रुपसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये मनी लाँड्रिंग आणि शेअर मार्केट मॅनिप्युलेशनबाबत अदानी समूहावर आरोप करण्यात आले होते. यानंतर अदानी एंटरप्रायझेस या कंपनीचे शेअर्स ३,५०० रुपयांवरून १,००० रुपयांवर पोहोचले होते.

अदानींवर केलेले पाच आरोप

  • अदानी ग्रुपने आपल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत मॅनिप्युलेट करून वाढवली.

  • मनी लाँड्रिंग आणि अकाऊंटिंग फ्रॉड केले. आठ वर्षांच्या कालावधीमध्ये ५ सीएफओ बदलले.

  • ग्रुपच्या सात कंपन्यांची किंमत ८५ टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच, स्काय रॉकेट व्हॅल्यूएशन केले आहे.

  • अदानी समूहावर २.२० लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यांच्या कंपन्यांच्या मूल्यापेक्षा हे कित्येक पटींनी अधिक आहे.

  • मॉरिशस आणि दुसऱ्या देशांच्या कंपन्यांना पैसे पाठवून, त्यांना अदानींचे शेअर्स खरेदी करायला लावले.

Adani on Hindenberg Report
Adani Group Stocks: GQG पार्टनर्सने 4 महिन्यांत अदानी समुहात केली एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; कारण...

गौतम अदानींनी हे सर्व आरोप फेटाळले असून, आपल्या कंपनीच्या बदनामीसाठी हा खोटा आणि चुकीचा रिपोर्ट प्रसिद्ध केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारताची अर्थव्यवस्था

दरम्यान, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत गौतम अदानींनी मोठं भाकित केलं आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा भारत हा २०३० पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. तसेच, २०५० पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असंही ते म्हणाले. पुढील दशकामध्ये प्रत्येक १८ महिन्यांना भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सने वाढू शकते, असं मत अदानी यांनी व्यक्त केलं.

Adani on Hindenberg Report
Adani Group Stock: 4,000 चा शेअर आला 656 रुपयांवर; अदानी समूहाच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार कंगाल

नवी मुंबई विमानतळ

नवी मुंबईमधील विमानतळ हे २०२४ च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असंही अदानी यांनी यावेळी सांगितलं. यासोबतच कॉपर स्मेल्टर प्रोजेक्टही नियोजित वेळेत पूर्ण होईल, असं ते म्हणाले.

ग्रुप परफॉर्मन्स

अदानी ग्रुपने २०२२-२३ या वर्षात कित्येक मोठे रेकॉर्ड केले. या आर्थिक वर्षामध्ये समूहाचे एकूण उत्पन्न ८५ टक्क्यांनी वाढले असून, २,६२,४९९ कोटी रुपये एवढे झाले. तर निव्वळ नफा ८२ टक्क्यांनी वाढून २३,५०९ कोटी रुपये झाला असल्याची माहिती अदानींनी दिली.

Adani on Hindenberg Report
Mumbai : धारावीच्या पुनर्विकासाची जबाबदारी अदानी समूहाकडे! महाराष्ट्र सरकारने दिली अंतिम मंजूरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.