Gautam Adani: गौतम अदानी सोडणार समूहाचे अध्यक्षपद, कंपनीची कमान कोण सांभाळणार, विभाजन कसे होणार?

Adani Group: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवृत्तीची योजना आखली आहे. 62 वर्षीय गौतम अदानी सेवानिवृत्तीच्या तयारीत असून, काही वर्षांत कंपनीची कमान पुढच्या पिढीकडे सोपवली जाणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनाबद्दल सांगितले.
Adani Group chairman
Gautam AdaniSakal
Updated on

Adani Group: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी निवृत्तीची योजना आखली आहे. 62 वर्षीय गौतम अदानी सेवानिवृत्तीच्या तयारीत असून, काही वर्षांत कंपनीची कमान पुढच्या पिढीकडे सोपवली जाणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी यांनी त्यांच्या निवृत्तीच्या नियोजनाबद्दल सांगितले. त्यांच्या योजनेनुसार ते 2030 पर्यंत कंपनीची कमान त्यांचा मुलगा आणि पुतण्यांकडे सोपवतील. गौतम अदानी यांनी वयाच्या 70व्या वर्षी निवृत्तीची योजना आखली आहे.

गौतम अदानी इतक्या लवकर निवृत्ती का घेत आहेत?

गौतम अदानी यांनी निवृत्ती योजना तयार केली आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ते 2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीची जबाबदारी त्यांची दोन मुले आणि दोन पुतण्यांवर असणार आहे.

अहवालात म्हटले आहे की जेव्हा अदानी निवृत्त होतील तेव्हा त्यांचे चार वारस - मुलगा करण अदानी आणि जीत अदानी आणि त्यांचे पुतणे प्रणव आणि सागर अदानी - कुटुंब ट्रस्टचे समान लाभार्थी असतील.

Adani Group chairman
consumption fund:कन्झम्शन फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल

गौतम अदानी यांच्यानंतर अदानी समूहाची कमान कोणाच्या हाती?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपन्यांमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतील यासंबंधी एक गोपनीय करार केला जाईल, ज्यामध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांमधील स्टेक आणि उत्तराधिकाऱ्यांमध्ये हस्तांतरणाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल.

सध्या गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी अदानी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आहे, तर छोटा मुलगा जीत अदानी अदानी पोर्टचे संचालक आणि सागर अदानी अदानी समूहाचे कार्यकारी संचालक आहेत.

Adani Group chairman
Tata Group: फक्त माया नाही तर हे दोन टाटा चालवू शकतात कंपनीची गादी! खुद्द रतन टाटा देतायत ट्रेनिंग

अदानी समूहाचा अध्यक्ष कोण होणार?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या निवृत्तीनंतर अदानी समूहाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही, मात्र अहवालानुसार करण अदानी आणि प्रणव अदानी हेच यासाठी प्रबळ दावेदार असतील.

Adani Group chairman
बाय, बाय, बायबॅक!

गौतम अदानी म्हणाले, व्यवसायाच्या स्थैर्यासाठी उत्तराधिकार खूप महत्त्वाचा आहे. समूहाची कमान दुसऱ्या पिढीवर सोपवली आहे कारण बदल हा गरजेचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.