Gautam Adani Networth: जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांना मागे टाकून जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनतील अशी शक्यता वर्तवली जात होती, तेव्हा दोघांमधील अंतर फक्त 16 अब्ज डॉलर होते. तेव्हा गौतम अदानी यांची संपत्ती 121 अब्ज डॉलर होती, तर इलॉन मस्कची संपत्ती 137 अब्ज डॉलर होती.
पण जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात, 24 जानेवारी 2023 मध्ये, हिंडनबर्ग अहवाल प्रकाशित होताच, अदानी समूहावर शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स पत्त्याच्या घरासारखे पडू लागले.
पुढच्या एका महिन्यात अदानी समूहाचे शेअर्स 85 टक्क्यांपर्यंत घसरले. त्यामुळे अदानी समूहाला अदानी एंटरप्रायझेसचे 20,000 कोटी रुपयांचे एफपीओही काढून घ्यावे लागले.
पण अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम गौतम अदानी यांच्या नेटवर्थवर झाला. 27 जानेवारी रोजी एका दिवसात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 20.8 डॉलर बिलियनची घट झाली. कोणत्याही अब्जाधीशासाठी एका दिवसातील हे सर्वात मोठे नुकसान होते.
अदानी समूहाचे बाजारमूल्य 150 अब्ज डॉलरनी घसरले. त्यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलरवर आली. ऑक्टोबर 2022 मध्ये एकेकाळी त्यांची एकूण संपत्ती 143 अब्ज डॉलर झाली होती.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची संपत्ती आता 60.3 अब्ज डॉलर आहे आणि चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत त्यांच्या संपत्तीत 60.2 बिलियन डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 21 व्या स्थानावर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.